
एका जोरदार टी . आर . पी असणाऱ्या सिरियल मधला सीन……………… सहनायिका नायिकेला म्हणते येकलस का ………… मी बाजारात जातीये संक्रांतिला हळदी कुंकवात काय वाण लुटावं याचा अंदाज घेऊन येते मग आपण सगळ्या ठरवूयात काय आणायचंय ते ……………इकडे TV बाहेर अय्या आपलं पण अजून काही ठरलं नाहीये बरी आठवण झाली. आज दुपारी डन करून टाकते - इति ताईमां ……………….गेल्या वर्षी कृषी ग्रामीण मधून आणलेले ऑरग्यानिक कडधान्याचे पाउच वाटतानाप्रत्येकीला सांगून झालं ……नैर्सगिक खाण्याचं महत्व काय ……………गावाकडे आमची किती शेतीवाडी …………अजूनही शेणखताचा होणारा वापर …………दुभत्या गाई …………etc etc ……………यंदा काय तर पनवेल नजीकच्या एका गावातल्या बचत गटाने केलेले काही प्रोडक्स लुटायचं आय मीन वाटायचं ठरतंय …………….आता हे सगळं तिथून आणण्याची जबाबदारी ओघाने आमच्या खांद्यावर येणार ……………विशेष म्हणजे पूर्वी ताईमां अगदी टिपिकल हळदी कुंकू करे पण गेल्या काही वर्षापासून ती काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करते …………अगदी थोडक्यात पण तरीही पारंपारिक ………………कधी तरी विषय निघाला आणि तिला म्हटलं काय हे कसले हळदी कुंकू उग्गाच पैशाचा खेळ त्यावर तिचं विस्तृत स्पष्टीकरण ऐकूण आक्षेप घेणारा अखेर स्वतः म्हणेल मी काय मदत करू का तुम्हाला ………………पण आधी तुमच्या या संवेदनशील भावनांना आवर घाला बघू ......................
तसही हे
हळदी कुंकवाचे फ्याड फार पूर्वीच गावाशिवात पसरलंय …………गावातली महिला मंडळे संक्रात ते २६ जानेवारी च्या दरम्यान आजही हा सोपस्कार पार पाडतात ………….आम्ही लहान असतांनाहि आईचे चार-पाच हळदी कुंकू असत त्यात वाडीच महिला मंडळ ………वार्षिक महिला बचत फंड …………………. मराठा समाज महिला हितवर्धिनी ………….आणि घरातला हळदी कुंकू वेगळाच ……तेव्हा सेम कलरच्या साड्या …….………प्लास्टिकच्या वस्तू ………….घरगुती वापराचा जिन्नस वैगरे लुटला जाई ………………… आईची जरी काठाची साडी …………तिच्या केसातली अस्टरची रंगीबेरंगी फ़ुल ……………तिनं आमच्यासाठी रुमालात बांधून आणलेले तिळाचे लाडू …………हळदी कुंकवाने भरलेलं तिचं कपाळ …………मोत्याची थोरली नथ ……………जसच्या तस आठवतंय ………………. विशेष म्हणजे याच दरम्यान फंड फुटे …………वर्षभर पदरमोड करीत हफ्ते भरणाऱ्या तिच्या झिजणाऱ्या हातात दुमडून आणलेल्या घडीतल्या नोटा मोजतांना क्षणाक्षणात तिचा आनंद वाढे …………किती झाले बाबू मुद्दल इतकी असल आणि व्याज इतकं अशा तिच्या अचूक तोंडी हिशेबाने पैशाची खरी किंमत तेव्हाच शिकवलोय आम्ही सगळी भावंड त्यामुळे आजच्या व्यवहारात तितकंसं आम्हाला कधी काही कमी पडत नाही ………………
© संतोष टाकळे .
No comments:
Post a Comment