अक्षरमंत्रा
सुचलेल्या , रुचलेल्या आणि खटकलेल्या प्रत्येक घडामोडींच शब्दांकन .
गणेश उत्सव @ कोकण
कोकणात अंधारूंन पाऊस पड़तोय .......वातावरणात गारवा आहे .अशा पावसाळी दुपारी गणेश उत्सवाच्या स्वागताच्या धामधुमीचे ढोल -ताशे आताशी कुठे विसावलेत. ........साग्र मंत्रोत पूजाअर्चा -आरत्या श्लोक आणि तदद् नंतर बाप्पाला त्याच्या फेवरेट मोदकां समवेत पंच पक्ववान्नाचा नैवेद्य दाखवून झालाय . आणि आता तो ही काहीसा सुस्तावलाय............सकाळ पासून अधे मधे लुड़बुड करणारी चिल्लर पार्टी मोदकाचे अतिजड़ घास ढकलुन पेंगलियत .....पानाचे चोबरे भरून पुण्या-मुंबईचे हालहवाल चर्चिणारे ओटी- पडवीत जागा म
िळेल तिथे लांब झालेत................... पहाटे पासून उत्सवी मोहिमेवर राबणाऱ्या बायाही काहीवेळ कलंडल्यात ...... आरासातील प्रखर दिवे मालवित फ़क्त मंद समईच्या प्रकाशात ........अगरबत्तीच्या धुरट रेघा धुमसता आहेत.......बाहेर पावसाचा जोर कायम आहे. कोकणातल्या कौलारु घरात आता पुढचे पाच दिवस अशी वर्दळ ....शांतता आणि पुन्हा धावपळ हा सिलसिला चालूच असेल . फक्त रविवारी मिळणारी उसंत आज मधल्याच दिवशी अनुभवण हे वेगळच सुख
आजच्या पहिल्या दिवसाची ही क्षणचित्र......थेट कोकणातून खास कोकणप्रेमी मित्रांसाठी .....
सोबत तुम्हा सगळ्यांना
गणेश उत्सवाच्या शुभेछ्या .....!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment