येवू घातलेल्या महाराष्ट्र १ या वृत्त वाहिनीचा सत्यनारायण सध्या जास्तीच फार्मात आहे . अनेकजण याची यथासांग वेगळी कथा ऐकवीत आहेत . पुरोगामी विचारांची नौका बुडाली वैगरे अशी चर्चा सोशल नेटवर्किंग वर उफाळतेय .या सगळ्यात वागळे आणि Yuvraj Mohite यांच्या नावाच जे धूप घालून सूप वाजवलं जातंय त्या बद्दल आणि विशेष: युवराज सरां बद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी कधीच ज्यांची देवावर आस्था आहे किंवा जे आस्तिक आहेत त्यांना उपदेशाचे डोस पाजले नाहीत . पण तरीही जे त्यांना खटकलं ते मला असं वाटतंय तू बघ विचार करून इतक्या सरळ भाषेत त्यांनी समोरच्याला सांगीतल्याच. अनेकजण मान्य करतील .....गेली काही वर्ष त्यांना प्रत्यक्ष ओळखतोय त्यांचा आपल्या कोकणातल्या घरी ( जिथे अति प्युअर अध्यात्मिक वातावरण आहे ) स्वतःच्या घरासारखा वावर आहे . म्हणून इतक्या वर्षात त्यांनी कधीच तुम्ही हा फोटो का लावलात अमक्याचा तमका संधर्भ आहे वैगरे वैगरे असली वायफळ चर्चा किंवा विरोध केला नाही . त्यांच्या मते व्यक्ती स्वातंत्र प्रत्येकाला आहे .फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये . आता जर भांडवलदार आस्तिक असेल आणि त्यांनी घातली असेल पूजा तर काय बिघडल तो त्या गुंतवणूक दाराचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला वागळे -मोहिते यांचे चश्मे घालण्याची आपली जबरदस्ती का ?
तसहि सम्यक पुरोगामी विचावंतांच्या गर्दीत संजय आवटे , प्रा हरी नरके , दीपक पवार , कविता महाजन, मुग्धा कर्णिक आणि असे काही मोजके चेहरे आकसा पोटी कधीच व्यक्त होत नाहीत त्यांनी मांडलेल मत हे बऱ्याच विचारांती आलेलं असतं आणि म्हणून अजूनही काहीसं आश्वासक वातावरण आहे अस म्हणायला वाव आहे . बाकी लॉबिंग , सेटिंग आणि सेल्फिश नेट्वर्किंग करणाऱ्या थोतांड विचारवंतांच्या बाजारा बद्दल न बोललेच बरं .
यांच्यातले काहीजण ज्या पद्धतीने अंगावर येतात त्यांना शिंगावर घ्याव की ××××वर हेच कळत नाही अनेकदा.
त्यामुळे नेमका कोणता नारायण आपल्याला खटकतोय हे आधी स्पष्ट केल पहिजे. नुसते लोकं घालतात म्हणून आपणही तुळशी पत्र ठेवत गेलो तर आपल्या द्वेषाची कलावती शुद्धित येण कठिण आहे .
यांच्यातले काहीजण ज्या पद्धतीने अंगावर येतात त्यांना शिंगावर घ्याव की ××××वर हेच कळत नाही अनेकदा.
त्यामुळे नेमका कोणता नारायण आपल्याला खटकतोय हे आधी स्पष्ट केल पहिजे. नुसते लोकं घालतात म्हणून आपणही तुळशी पत्र ठेवत गेलो तर आपल्या द्वेषाची कलावती शुद्धित येण कठिण आहे .

No comments:
Post a Comment