सवाई.....!



सवाईतल्या रिदम न अनेक विसस्मरणात गेलेल्या सुरांचा शोध घेतला आणि खुपस पुन्हा आठवतं झाल. जगण्याच्या लयीत जर कधी वर खाली झालच आणि आपण ते जाणवू दिल नाही तरी ते लोकांच्या लक्षात येतच.शिवाय तुम्ही जर जास्ती अपेक्षित असलात तर मग अधिकच्या तपासण्या ठरलेल्या
खरतर बंदिश लाजवाब व्हावी म्हणून लागलेला सुर जितका आकंठ जपला जातो .तितक जगण लावून धरण म्हणजे अनेक टप्यानवर तुमचा कस लागणच असत म्हणा .कारण इथ पेटी- तबला- सितार रागाच्या स्वरांशी सेट करता येत असल तरी जगण्याच्या चौकटीत अनपेक्षित आलापांची सांगड लायीत बसवण दुर्मिळ .
तब्बल पाच वर्षानी सवाई ऐकता आला सोबत पालकर .....त्यांच्या इतकेच त्यांचे असामी मित्र आणि जिप्सी कार मंदार भालेराव यांचा पाहुणचार ,गुड़ लकचा ईरानी चहा , आणि पुन्हा पुणे मुंबईचा शिवनेरी प्रवास ......म्हणजे आता उद्या पासून परत तेच प्रयोग सुरु जिथे आवरण- उरकण- आटोपण- 
याची तालीम करावी लागत नाही


http://epaper3.esakal.com/…/No…/Mumbai/MumbaiToday/page6.htm

मावशी काय हाय काय ................ !








मावशी काय हाय काय म्हणत तीन दारतून आत डोकावल आणि तिच्या हातातल्या प्लास्टिक पिशवीतल्या भातावरच्या बूंदीच्या लाड़वाकड़ नजर गेली . नेमकी जेवताना आलीस बाय अस अजुन थोड़ अधिक कमी ऐकवत ताईमाँ न दुपारच्या दोन चपात्या वर आताची ताजी मेथिची भाजी दिली तरी ती घुटमळत तिथच उभी अजुन काय पाहिजे बाय आता...... तिन पापड़ा कड़ बोट दाखवत पुन्हा आर्जवि चेहरा केला. एक आख्या तूकड़ा घेतलांन तेव्हा कुठ ती गेली.
पण तिच्या पिशवीतला लाडू मात्र काही काळ माग घेवून गेला .
हेच ते दिवस कडाक्याची थंडी .....शाळेतन आल दप्तर टाकल की थेट मळ्यात ..... मुळा- माठ -पालक - कोथिंबीरिच्या जुड़या बांधायच्या पाटातल्या व्हावत्या पाण्यात त्या स्वछ धुवायच्या आणि हारा भरायचा अगदी काठोकाठ .....मग सकाळी आई चारला उठून पाणी तापवायची इतक्या हुडहुडनाऱ्या थंडीत अंगावर पाणी घेण म्हणजे काय ते ज्याच त्याला माहित ........बाकि सगळ उरकेपर्यंत वैलावरचा चहा उफाळून यायचा मग डायरेक बशीत त्यांचे दोन चार भुरके मारले आणि मग गरम स्वेटर चढवला की चिंबुळ नीट बरोबर ठेवत हारा डोक्यावर घ्यायचा . आणि मग हातात सकळच्या काळोखात मोकाट कुत्र्याना हटकायला काठी घेत पायात चपला सारित अंधारातल्या रास्त्यान दापोलिच्या दिशेनं लगबगिने पावल टाकित उजाडायच्या सुमारास भाजी घ्या भाजी ची कमर्शियल advt सुरु करायची.बऱ्याचजणी तर आईचा आवाज ऐकूनच गलका करायच्या कुणी नुसतीच् भाजी उलटी पलटी करी घ्यायच तर काय नाव नाय पण उग्गाच भाव करायच्या ....तर उलट एखादी बाई एकदम चार चार जुड़या घेई. आशाना मग आई करंट स्पॉट ऑफर म्हणून कधी अजुन एक जुडी अशीच फुकट देई तर कधी तिच्या नेहमीच्या गिराईकाची स्पेशल रिक्वेस्ट म्हणून आणलेल्या बचकी भर घोळीच्या ढिऱ्यांचे -केळफुलाचे........वाटिभर साजुक तुपाचे ......डबाभर दह्याचे ती कधी पैसे घेत नसे ......अशा खास घावुक आणि फिक्स गिर्याइकाकडे मग आम्हाला चहा ठररेला सोबत खारी, टोस्ट ,बिस्किट आणि गोड धोड .....अस बरच काही ........पण खायला तितका वेळ नासायचा कारण खात बसलो तर दूसरा भाजी वाला पुढ़ जायचा आणि आज काय वाहिनी येत नाहीत म्हणून ठरलेले गीराहाईक पण त्याची टोपली खाली करायचा म्हणून मग नुसता चहा पोटात ढकलून बाकि सगळ पिशवीत जमा करीत आधी माल संपवायचा आणि मग उन्ह थोड़ी सरळ पडलित की घरी आल्या आल्या मागच्या दारात पिशवी पालथी घालायची ....जे असेल त्याच्या चार वाटण्या व्ह्ययच्या मघाशी मागायला आलेल्या त्या पोरिच्या पिशविताला लाडवा सारखा लाडूही या पिशवीत यायचा अनेकदा आणि मग त्याचा अधिक हिस्सा मिळावा म्हणून त्याचे तूकड़े पाड़ताना आपला भाग जास्ती पडेल याची केलेली हेराफेरी आजही आठवते आहे .


मघाशी तिच्या पीशवितल्या भातात अड़कलेला तो लाडू एव्हाना वाटून खावुनही झाला असेल पण त्याच्या त्याच बूंदीच्या बांधणीत घट्ट वळून ठेवलेल्या आठवणी आज पुन्हा मोकळ्या झाल्या आणि त्या दिवसांची ती अविट गोडी पुन्हा मनात घोळत राहिली कितीतरी वेळ ........... सध्या सुखवस्तु घरात खावुचे डबे तुडुंब भरलेले असतांना आणि आज हवी ती मिठाई घेता येण्याची परिस्थिती असतांनाही त्या एक तूकडा लाड़वाची किंमत मात्र कधीच अवाक्यात न येणारीच.

© Santo 

तुळशीच लग्न........!






पूर्वी तुळशीच लग्न लागल की मग माणसांच्या लग्नाचे मुहूर्त निघत पण हल्ली वर्षभर लग्न होत असतात तरीही आजही एकादशी नंतर गावात तुळशीच लग्न साग्रसंगीत लावल जात .....आंब्याच्या काटक्या बांधून बनवलेल्या नवरा- नव्हारीच्या बाहुल्या त्याला रुईच्या पानावर काजळाने डोळे चेहरा रेखाटून काढलेला मुखवटा .... रुई चाफ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या .......आणि मग रात्रभर हळदीच्या पाण्यात भीजत ठेवलेल्या वस्त्रांनी गुंडाळुन तयार झालेले बाहुले तुळशीच्या मधोमध रोवून ......रुखवात म्हणून आवळे -चिंचा -बोरं- आणि इतर गोड- धोड पदार्ध मांडून गावातली माणस लग्न लावायला येईस्तोवर नविनच केलेल्या सारवलेल्या अंगणात डोंगर का पाणी..... विष अमृत .....संत्र का लिम्बु ....रा रा राम असले तेव्हाच खेळ खेळले जायचे .अखेर फिरता भटजी येई .अक्षदा वाटल्या जात .रितसर लग्न लावल जाई .शेवटच्या मंगल अष्टकेला शंभरची माळ लावत सोहळा पार पड़े .....भटजीही दक्षिणेचे दहा रुपये खिशात कोम्बत पुढच्या घरी जाई मागे मागे वाढत व्हराड पुन्हा त्याच्या मागून दुसऱ्या तुळशीच्या लग्नालाची अक्षदा घ्यायला नव्या अंगणात जमत .रात्री उशिरा पर्यंत ही लग्न लागत असत .आणि लोक अक्षदा टाकून टाकून दमत असत.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नवरा- नवरीला घराच्या छपरावर फेकण्याची प्रथा आहे.

आणि मग जो नवरा नव्हरी फेकल सुखवतीच्या आवळे चिंचा बोर हा सगळा माल त्याचा .शिवाय मामा म्हणून तुळशीत उभा केलेला काळा उसही त्याचाच 
यंदा हे सगळ आई -बाबां सोबत सुप्रिया ने केलय.
सो क्रेडिट गोज टु हर & ब्रो अमित .

© Santo 


भावनिक संध्याकाळ............!






आजची संध्याकाळ अतिशय भावनिक होती. भाच्या सोबत फटाके आणायला गेलो त्या दुकानात शाळेतले गुरूजी भेटले योगायोग म्हणजे ते दुकान त्यांचच होत. त्यांना नमस्कार केला तेंव्हा त्यांनी ओळखल नाही .गुरुजी मी टाकळे उदयनगर शाळेत होतो.आता वय झालय रे तरीही आठवतोयस तू टाकळ्या ......काय करतोस वैगरे चौकशी झाली आणि मग फटाके घेतले दहा बारा आयटम जमा करत हे द्या म्हटल्यावर त्यांनी यादी केली

 एका कोपऱ्या कागदावर त्यांची आंकड़े मोड़ सुरु झाली .अगदी तशीच जशी वर्गात गणित शीकवत असतांनाची असायची तशी आणि मग लमसम आकड़ा शेवटी मांडत त्यांनी पावती समोर धरली म्हणाले बघ बरोबर आहे ना तपासून घे ........गुरूजी अहो अंकलिपी तुम्हीच शिकवलित मला आता मी तुमची बेरीज कशी तपासू…...ती अचूक असणारच ....तेंव्हा गुरुजीनी जवळ घेतल आणि म्हणाले तू काय बोलायला ऐकणार नाहीस अतिशय आनंद होतोय मला तुला भेटून हे घे अजुन एक फटाक्यांची माळ माझ्याकुडून तुला...... कधीकाळी गणितं चुकली म्हणून पाठीत धपाटा घालणारे .तलाठी गुरूजी आज हळवे झाले होते. बदडवून काढ़णारे तेच हात आज मायेने पाठीवरून फिरत होते. कित्येक वर्षानी पुन्हा शाळेत गेल्यागत वाटत होतं कारण तलाठी गुरुजीनी कितीही मारल झोडलं तरी शाळा सुटायच्या आधी ते बोलवून जवळ घेत समजुत काढत म्हणत शिकलास तर आयुष्यात काहीतरी चांगल करता येईल आणि शिवाय नोकरी धंदा मिळेल नाहीतर अडाणी राशील तर आयुष्य खूप खडतर आहे रे तु नीट अभ्यास केलास तर गद्यड्या मग मला हात उचलावा लागणार नाही.जा उद्या येतांना आजच काय शिकवलंय त्याची उजळणी करून ये. 

माघाशी निघता निघता त्यांनी पुन्हा पाठीत धपाटा घातला आणि म्हणाले टाकळ्या . खुप मोठा हो अगदी आम्हाला तुला भेटायला ताटकळत उभ राहाव लागेल इतका .........आणि पुन्हा त्यांचे डोळे पाणावले गुरूजी कितीही मोठ व्ह्ययच स्वप्न असल तरी तुम्हाला माझी वाट बघावी लागेल इतकं मोठ् नाही व्हायचय मला.



© Santo 

रेशनिंग दिवाळी..........!




दिवाळी पंधरा एक दिवसावर आली की रेशनिंग वर डाळ -साखर-पामतेल( दिवाळीतल्या पणत्या पेटवायला वापरलं जाणारं स्वस्त तेल )-रॉकेल आलय का याची चौकशी करायला आई एक दिवसा आड़ पाठवत असे . सोबत कार्ड -पिशवी आणि पैसे घेवुनच जा म्हणायची ..... काय माहित आलीच असेल तर लगेच पावती करायच्या लायनीत नंबर लाव.नाहीतर पुन्हा घरी येवून जाइस्तोवर रांग पार बोरीखाली पोचायची मग काय दुपार शिवाय नंबर लागनार नाय.
सुट्टीच्या काळात येन खेळ रंगात आला असतांना आता कुठ मरायला रेशन वर जायचं म्हणून थोड़ासा वैताग यायचा पण मग शिव्या कोन खायील म्हणून ना इलाजास्तव सायकलला पिशव्या लटकवत जावच लागे. ......अशा सतत दोन चार दिवस फेऱ्या मारल्या की रेशनिंग वालाही वैतागायचा आणि अंगावर येत म्हणायचा अरे गाड़ी आली नाही रे अजुन येईल उद्या परवा......... की अस करू तूझी पावती करून घेतो आणि आधी ट्रक तुझ्या घरासमोर उभा करुन माल तुला देतो आणि मग गाड़ी दुकानाकडे फिरवतो ...........या अशा खोचक बोलण्याचा प्रचंड राग यायचा तेंव्हा वाटायच रॉकेलचा रिकामा कँन डोसक्यात घालावा त्या म्हाताऱ्याच्या .....पण गरज आपल्याला त्याला नाय म्हणून गप बसावं लागायचं ..........अशात एक दिवस ताड़पत्री मारलेला मोठा ट्रक रेशनदुकाना समोरून वळतांना दिसयचा आणि जीव भांड्यात पडायचा. सायकल धकाड्याला टेकून उभी करत पिशव्या काढीत एका दमात पावतीची लाईन धरायची . अजून अर्धा- एक तास लागेल पावत्या करून बाहेर बसा पोती लावून त्यांची नोंद करायला वेळ जाईल टिपिकल ब्राम्हणी हेक्यातला तो आवाज ऐकून पावत्या करून घुटमळणारे बाहेर येत बोरीच्या सावलीत बसत. उन्ह तशी वर येत असायचीत म्हणजे ११ वाजले असतील हा अंदाज तंतोतंत खरा निघायचा रस्त्यावरून जाणाऱ्याला विचारलं काका किती वाजले कि तो म्हणायचा ११ ला ५ कमी पाहुणे बाराला दुकानातला गडी बाहेर येत चला पावतीच्या नंबरांन लाईन लावा . कि थोडी विसावलेली गर्दी पुन्हा उसळत सळसळायची साखरेला आणलेली मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या , रॉकेलचे कँन, गहू -तांदळासाठीच्या सिमेंटच्या गोण्या भराभरा बाहेर निघत . तिकडं तागडीवर असलेला दिन्या उग्गाच भाव खायचा धान्य जोकतांना इतकी घाई करायचा कि ५० -१०० ग्रॅम कमीच जोकलं जाई . पिशवी अशीच धर, कँन असाच पकड अशा त्याच्या उद्धट ऑर्डरी ने डोक्यात जायचा तो वर्षभर पडीक असलेला हा दिवाळीत इतका डबल भावात का येतो याची चीड यायची. पण इथेही सालं तेच आपण गरजवंत . इतकी सगळी उलटा पालटी करून शेवटी हातात आलेल्या चार पिशव्या आणि पाच लिटर कँनच्या रॉकेल मध्ये दिवाळी आली हो चा फील येई . त्या शे दोनशेच्या त्या जीन्नसात सणासुदीचा आनंद खच्चून भरलेला असे .
काल कागदपत्र शोधताना फायलीत फोल्डर मध्ये अडकवलेला रेशनिंग कार्ड पाहिला आणि एकेकाळी याच्या बारीक चौकटीत युनिट मांडत सरकारी पावतीवर कित्तेकांच्या घरातल्या धान्याची नोंद होई तो त्याचा जुना डिमांडिंग काळ आठवला आणि सध्या नुस्त एक लीगल document म्हणून पडून असलेल्या माझ्या स्वतंत्र कार्ड्याच जाम वाईट वाटलं. कारण हल्ली सुपर मार्केट , बिग बझार , डी मार्ट च्या खरेदीत वस्तू घ्यायला नाही तर पैसे द्यायला लाईन लावावी लागते .आणि इथल्या शॉपिंगच्या फ्री होम डिलिवरी , discounts, स्पेशल ऑफर्स, बंपर सेल ,etc etc ने ट्रॉली कितीही फुल्ल झाली. तरी यार त्या सायकलवरच्या चार पिशव्या रेटत घर गाठतानाची मज्जा काही औरच होती . अर्थात जुन्या दिवसात नुसतं गुंतायच नाहीये पण आठवणी इतक्या लक्ख प्रकाश देणाऱ्या असल्या कि भूतकाळ सहसा अंधारात ठेवता येत नाही . त्याला निमित्त मात्र लागतं फुलबाज्या तुड -तुडायला पणतीची पेटती वात लागवी अगदी तशी .
© Santo 

पढना है जरुरी ............!



  नुकताच भूषण कोरगांवकर या आपल्या मित्राचं  "संगीत बारी " हे अफलातून पुस्तकं वाचून झालंय आणि तसही वर्षभर पुस्तकं सोबत घेऊन फिरणाऱ्या  
आपल्या बहुतीकांना "वाचन प्रेरणा दिन " वैगरेच तस निमित्त लागत नाहीच म्हणा . पण आज ज्यांच्या जयंती निमित्त हा दिवस साजरा केला जाणार आहे. ते जेष्ठ Scientist, खऱ्या अर्थाने भारतरत्न आणि भारताचे माझी राष्ट्रपती  डॉ ए . पी . जे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे . त्याचं "अग्नीपंख" हे पुस्तकं तर प्रचंड आवडलेल्या पुस्तकां पैकी एक . खरतर त्यांनी इतक्या लवकर exit घ्यायला नको होती .त्यांचा व्यासंग , संशोधन,  कामाप्रती असणारी असीम श्रद्धा , आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साधेपणा आपल्या सगळ्यांचा स्वयंप्रेरणा देणारं आहे . 

अर्थात हा दिवस साजरा व्हायला हवाच ............याबाबत मतभेद नाहीच.   याच  निमित्त म्हणून  चार- पाच  महिन्यांन पूर्वी कामतने (Ajit Abhimeshi ) त्याच्या शेल्फ मधून दिलेलं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केललं प्रोतिमा बेदी यांच "टाईमपास" हे पुस्तकं  वाचायला घेतलंय . प्रोतिमा बेदी यांनी त्याकाळात ज्या धाडसान बिंदासपणे जे आयुष्य जगलं हि त्याची कहाणी आहे . इतक्या बोल्ड स्वरुपात एका बाईन तिचं खासगी आयुष्य लोकांसमोर मांडणं हि डेरिंग आहे . बरं यात नुसती रंजकता  नाही तर जगतांना आलेल्या अनेक बऱ्या वाईट अनुभवात स्वतःला  न्यूट्रल ठेवीत येईल ते कसं स्वीकारावं त्यातून कसा मार्ग काढावा असा सगळा परिपाक यात असल्याचं जवळजवळ अर्ध पुस्तक वाचून झाल्यावर कळतंय               
    
सुप्रिया वकील यांची अनुवादित पुस्तकं तशी भन्नाट असतात.  कारण त्या नुसतं भाषांतर करीत नाहीत तर त्या वाचकांशी उत्तम संभाषण करतात. आणि म्हणून हे मूळ लेखक स्वतः त्याच्या तोंडून हे सगळं आपल्याला सांगतोय असा आभास होतो. आपल्यापैकी कुणी जर "टाईमपास"  हे पुस्तकं अजून वाचलं नसेल तर नक्की वाचा . डिप्रेशन वैगरे चा कुणाला त्रास असेल तर त्यांनी जरूर हे पुस्तकं  डोळ्या खालून घालायला हरकत नाही . "वाचन प्रेरणा दिन " सेलीब्रेट करण्याकरिता जे पुस्तकं हातात आलय त्याचा योगायोग म्हणजे  डॉ ए . पी . जे अब्दुल कलाम यांची काही पुस्तकं  सुप्रिया वकील मॅमनी भाषांतरित केली आहेत हे विशेष.

 पुस्तकांच विश्व मंतरलेल आहे . तुम्ही जितक्या आत जाल तितक अजून पुढे जाण्याच तुमचं कुतूहल वाढत राहील . शिवाय वाचाल तर टिकाल हेही लक्षात असायला हवंय . बाकी ज्यांनी सतत माझी हि वाचनाची आवड त्यांच्या कडील उत्तोमोत्त पुस्तकं देऊन जोपासली त्यात  दापोलीत असतांना त्याच्या संग्रहातून दर आठवड्याला एक नव पुस्तक देणारा माधव काका ( जेष्ठ लेखक माधव गवाणकर ) मग मुंबईत आलो आणि पत्रकारिता करीत असतांना त्याच्याकडची पुस्तकं देणारा सुनील नांदगांवकर( Sr. Journalist),  पुढे पुकार या संथेसाठी रिसर्च करतांना मेंबरशीप घेतलेलं  दादर सार्वजनिक वाचनालय , आग्रहानं  हे वाच सांगणारी वंदना खरे ( लेखिका , नाटककार , समीक्षिका आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या )  , आवडलेलं पुस्तकं आणि त्यासोबत माझ्या फेवरेट खाऊची पुडी शेअर करणाऱ्या मीनाक्षी शिंदे ( लेखिका ) , परममित्र अजय सिंग (एक उत्तम शिक्षक , मराठीचा गाढा अभ्यासक आणि हौशी वाचक ) , युवासाठी अजित कामत ( सामाजिक कार्यकर्ता )  यांचे विशेष आभार तुमची माझ्याकडे असलेली पुस्तके सहीसलामत आहेत त्यामुळे त्याची काळजी नसावी . आणि हो तुम्ही देखील जे पुस्तकं वाचताय त्याबद्दल आम्हाला सांगायला हरकत नाही . आजचा दिवस अशा शेअरिंगने अधिक सत्कारणी लागेल . 

या ग्रंथ दिंडीत तुम्हीही सहभागी व्हाच . 

जाता जाता डॉ ए . पी . जे अब्दुल कलाम यांचा हा आजच्या दिनविशेषला लागू होणारा सुविचार. 

- "One Best Book Is Equal To Hundred Good Friends " . . . "But One Good Friend Is Equal To A Library ". 

समजुतीच शहाणपण -अपनी हैसियत


काल डॉक्टरांनी लिहून दिलेल्या रक्ताच्या चाचण्या करायला ज्या pathology lab ची पावती दिली होती . ती lab बघून वाटलं नक्की हाच पत्ता आहे ना ? CCD - बरीस्ता आणि तत्सम टाईपच इंटेरियर आणि तसा लुकही आत गेल्या गेल्या................ ब्लड टेस्ट ......... OK Please Have a सीट...............लुश लुशीत सोफे , फ्रेश फुलांनी भरलेला पॉट , डीझील दिवे , समोर टीपॉयवर असलेली मेजर इंग्लिश मासिकं आणि पेपर्स , इतक्यात वाफळती कॉफी आली . मी हाथ पुढे करणारच होतो तोवर तिनं एक स्माईल देत. sir not for u...........mam प्लीज have म्हणत ट्रे ताईमां च्या पुढे धरला . इकडे माझ्या घश्यात त्या tempting refreshing smell न आणिक कोरड पडली . एकतर सकाळ पासून पाण्याचा थेंब नव्हता पोटात त्यात कॉफीच्या वासानं तर डचमळून आलं अगदी.............एक सिप घेत ताईमां - और कितना टाइम लगेगा जल्दी करो ना ................ काम पे भी जानेका है इसको. yes mam more 5-10 min only.......... ती अजुन पुढ काहीतरी बोलणार इतक्यात its OK mam fine will wait ...........इथल एकंदरित वातावरण पाहता हे खर्चिक प्रकरण आहे. याचा अंदाज आलाच होता. एवढ्यात बिलाची counter slip उंचावत कॅश counter च बोलवण आल. ................प्लीज पेड युवर बील सो विल प्रोसीड फॉर टेस्ट्स ............. बिलावरचा चार आकड़ी अंक बघून बाप रे एवढे.................... लुटायलाच बसलेत मेले पैसे लावायची ही काय पद्धत. ती कॅश counter वाली या सगळ्याकडे इग्नोर करत सर कॅश or कार्ड............... कार्ड............लागलीच त्यांनी come inside म्हणत हाताला घट्ट पट्टी बांधत रिकामी नळीत मावेल इतक्या रक्ताचा उपसा केला.सर सॉरी वी want more ब्लड म्हणत तीन दुसऱ्या हाताला पुन्हा घट्ट पट्टी बांधली . एक कळ सोसत नाही तोवर दुसऱ्या कळीचा दणका आणि इकडे बाहेर ताईमां- देखो ना तुवर डाल भी २०० रुपये हो गया कैसा जियेगा आम आदमी .......वैगरे वैगरे टिपिकल चर्चा झोडीत तीन -चार जणींचा घोळका गोळा करीत - मोदी जी - फडणवीस - नव सरकार यांची उणी- धुणी काढीत तिच्यातल्या सामान्य माणसाच्या "मन" की भडास ला काढणं चालू होतं आणि त्या बायकाही हां भाभी नही तो क्या सही बात कर रही हो ये नये सरकार ने भी रसोई का बजेट बिघाड दिया. हमे फडव्णीस जी से अशा थी etc etc इकडे माझा जीव पार कासावीस झालेला.
घरी माघारी येतांना ......आता संध्याकाळी त्या डॉक्टरला बघते . कुठ पण काय लिहून देतो किती महाग आहे इथं त्या मेल्याला काय कमिशन मिळल्याशी कारण . सुया टोचलेले ठणकते हात जोडीत तिला म्हटलं बाई तू शांत राहा जरा किती बोलशील . तुवर कि डाळ काय , कांदे का भाव काय कसलं embarrass फील झालं मला. insurance आहे त्यात कव्हर होईल सगळं त्यावर ती म्हणाली
महागाईचा पण विमा असता तर आम्ही कशाला कोकललो असतो बाबा . तुमच्या कार्डमधले पैसे उडतांना दिसत नाहीत किंवा तितक्या पैशाचं तुम्हाला इतकं काही वाटत नसेल म्हणून............. पण रोज भाजी आणायला गेल्यावर १०० ची नोट मोडली कि त्यातली फक्त चिल्लर पर्स मध्ये परत घरी घेउन येतांना जीव जळतो रे ................१० पैशाच्या हिशोबाने व्यवहार शिकलोय आम्ही आता लाखालाही भाव उरला नाही . अर्थात पैशाचा रेट वाढलाय वैगरे हे ठीक पण ज्या जवळ जितका तो तितक्याच हिशोबात त्याचं गणित मांडणार ना रे

© संतोष

कोणता नारायण खटकतोय ?



येवू घातलेल्या महाराष्ट्र १ या वृत्त वाहिनीचा सत्यनारायण सध्या जास्तीच फार्मात आहे . अनेकजण याची यथासांग वेगळी कथा ऐकवीत आहेत . पुरोगामी विचारांची नौका बुडाली वैगरे अशी चर्चा सोशल नेटवर्किंग वर उफाळतेय .या सगळ्यात वागळे आणि Yuvraj Mohite यांच्या नावाच जे धूप घालून सूप वाजवलं जातंय त्या बद्दल आणि विशेष: युवराज सरां बद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी कधीच ज्यांची देवावर आस्था आहे किंवा जे आस्तिक आहेत त्यांना उपदेशाचे डोस पाजले नाहीत . पण तरीही जे त्यांना खटकलं ते मला असं वाटतंय तू बघ विचार करून इतक्या सरळ भाषेत त्यांनी समोरच्याला सांगीतल्याच. अनेकजण मान्य करतील .....गेली काही वर्ष त्यांना प्रत्यक्ष ओळखतोय त्यांचा आपल्या कोकणातल्या घरी ( जिथे अति प्युअर अध्यात्मिक वातावरण आहे ) स्वतःच्या घरासारखा वावर आहे . म्हणून इतक्या वर्षात त्यांनी कधीच तुम्ही हा फोटो का लावलात अमक्याचा तमका संधर्भ आहे वैगरे वैगरे असली वायफळ चर्चा किंवा विरोध केला नाही . त्यांच्या मते व्यक्ती स्वातंत्र प्रत्येकाला आहे .फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये . आता जर भांडवलदार आस्तिक असेल आणि त्यांनी घातली असेल पूजा तर काय बिघडल तो त्या गुंतवणूक दाराचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला वागळे -मोहिते यांचे चश्मे घालण्याची आपली जबरदस्ती का ?
तसहि सम्यक पुरोगामी विचावंतांच्या गर्दीत संजय आवटे , प्रा हरी नरके , दीपक पवार , कविता महाजन, मुग्धा कर्णिक आणि असे काही मोजके चेहरे आकसा पोटी कधीच व्यक्त होत नाहीत त्यांनी मांडलेल मत हे बऱ्याच विचारांती आलेलं असतं आणि म्हणून अजूनही काहीसं आश्वासक वातावरण आहे अस म्हणायला वाव आहे . बाकी लॉबिंग , सेटिंग आणि सेल्फिश नेट्वर्किंग करणाऱ्या थोतांड विचारवंतांच्या बाजारा बद्दल न बोललेच बरं .
यांच्यातले काहीजण ज्या पद्धतीने अंगावर येतात त्यांना शिंगावर घ्याव की ××××वर हेच कळत नाही अनेकदा.
त्यामुळे नेमका कोणता नारायण आपल्याला खटकतोय हे आधी स्पष्ट केल पहिजे. नुसते लोकं घालतात म्हणून आपणही तुळशी पत्र ठेवत गेलो तर आपल्या द्वेषाची कलावती शुद्धित येण कठिण आहे .

गणपती बघायला जायचा उत्साह .................!


मुंबईत नविन होतो तेंव्हा हौसेने गणपती बघायला जायचा उत्साह दांडगा होता .लालबाग परळ विभागातले सगळेच महत्वाचे उंच च्या उंच गणपती रात्री उशीरा पर्यंत बघतानां गम्मत वाटे........ तेंव्हा तर मी अतिशय श्रद्धाळु अगदी नतमस्तक होणारा वैगरे .......आता तसल काही राहील नाही. कधी वाटलच तर सकाळी लवकर उठून पायी चालत जातो प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला सकाळच्या प्रसन्न वातावरणात अनवाणी चालतांना अजूनही जमिनिशी नातं कायम असल्याची जाणीव होते.रस्ता तसा शांत असतो त्यामुळे डोक्यात अनेक गोष्टी नव्याने विचारात घेता येतात. पहाटेचा लोकांचा दिनक्रम ....फुटपाथवर राहणारी माणस त्यांच्या मनाने आपण घरात राहणारे किती सुखी आहोत .आपल्या जगण्यातल्या असंक्य तक्रारींचा डोंगर कोसळून पडतो अशा वेळी

तर मूळ विषय असा की आज कित्तेक वर्षानी मुंबईच्या मंडळांचा आढावा घेण्यासाठी ऑफिशली ड्यूटी लागली आणि गिरगाव ग्रांट रोड च्या एकुण 10 मंडळांच्या गणेशाच कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने दर्शन झाल यातले कित्येक गणपती आज पहिल्यांदा पाहिले आणि वाटल अजूनही काही ठिकाणी निखळ उत्सव सुरु आहे. तो चाळीच्या मधल्या पटांगणात बसलेला गणपती ....अतिशय मोजक डेकोरेशन ......नेटक्या साड्या ल्यालेल्या चाळीतल्या वाहिनी -काकू -आणि अगदी आज्जीच लायीत वाजनार सात्विक भजन आणि सर्वात विशेष म्हणजे आगत्याने होणार तुमच स्वागत .....आता आम्ही जाहिरात दिलीय म्हणून महागड्या गाडीतून उतरल्या उतरल्या आमचा विशेष गौरव् वैगरे करण असल काही झाल नाही .आणि मुळात मला ते पटतही नाही आम्ही जाहिरात देतो म्हणजे आम्हाला आमच्या प्रोडक्टला मार्केट करायचय हा आमचा निव्वळ स्वार्थ आहे .त्यात विशेष सन्मान स्विकारण्या सारख काही नाहीच.

पण या निमित्ताने मात्र एक संगावस वाटतंय की अख्या मुंबईत फक्त लालबागचा राजा , तो सावुथवाल्यांचा माटुंग्याचा श्रीमंत गणपती , आणि असे नेमके नवसे गणपती बसलेले नसुन इतर चिखल वाडीचा ,तुलसी वाडीचा , नाना चौकातला गिरगावकरांचा,ग्रांट रोड वाल्यांचा असे अनेक पारंपरिक बाज असलेले गणराय विराजमान झालेत याची आपल्या तमाम मागणी खोर भाविकांनी नोंद घ्या नवसाचे दाग दागिने.,पेढ़े नारळ या करोड़पति गणपतीनां वाटून झाले असतील तर जरा वाट वाकड़ी करत या बाकीच्या गणेशांच दर्शनहि घ्या.... थोड़ अधिक समाधान वाढेल तुमच्या नवसीमय काळजात.

© संतोष टाकळे .



गणेश उत्सव @ कोकण


कोकणात अंधारूंन पाऊस पड़तोय .......वातावरणात गारवा आहे .अशा पावसाळी दुपारी गणेश उत्सवाच्या स्वागताच्या धामधुमीचे ढोल -ताशे आताशी कुठे विसावलेत. ........साग्र मंत्रोत पूजाअर्चा -आरत्या श्लोक आणि तदद् नंतर बाप्पाला त्याच्या फेवरेट मोदकां समवेत पंच पक्ववान्नाचा नैवेद्य दाखवून झालाय . आणि आता तो ही काहीसा सुस्तावलाय............सकाळ पासून अधे मधे लुड़बुड करणारी चिल्लर पार्टी मोदकाचे अतिजड़ घास ढकलुन पेंगलियत .....पानाचे चोबरे भरून पुण्या-मुंबईचे हालहवाल चर्चिणारे ओटी- पडवीत जागा मिळेल तिथे लांब झालेत................... पहाटे पासून उत्सवी मोहिमेवर राबणाऱ्या बायाही काहीवेळ कलंडल्यात ...... आरासातील प्रखर दिवे मालवित फ़क्त मंद समईच्या प्रकाशात ........अगरबत्तीच्या धुरट रेघा धुमसता आहेत.......बाहेर पावसाचा जोर कायम आहे. कोकणातल्या कौलारु घरात आता पुढचे पाच दिवस अशी वर्दळ ....शांतता आणि पुन्हा धावपळ हा सिलसिला चालूच असेल . फक्त रविवारी मिळणारी उसंत आज मधल्याच दिवशी अनुभवण हे वेगळच सुख
गणेश उत्सवाच्या शुभेछ्या .....!



हा निषेधाचा कोणता प्रकार .......!


हा हेकेखोरपणा आहे शिवाय आम्हीच बरोरबर हा समज अधिक वाढवत आपण या वादात जास्ती तेल घालण्याचा काम करतोय . आणि विषय अधिक ज्वलंत करतोय . हे मनसैनिक आणि स्वतःला पुरोगामी विचारवंत समजणांऱ्याना पटणार नाही मुळात जैन समाजातही दोन गट आहेत त्यातला एक गट जो सत्ता , पैसा आणि राजकीय हितसबंध यांच्या जोरावर अतिरेक करत मुजोरी करतोय. तर दूसरा गट म्हणतोय आपण नाही ना non veg खात अहिंसा करत मग इतरांनी ती करू नए असा आग्रह किंवा जबरदस्ती कशाला.आपल्या धर्मानुसार आपण वागू त्यांना करुद्यात् त्यांच्या नुसार ......
मनसे बद्दल -
मनसेच झालय अस की यांच्या थिंक टँक मधे गड़बड़ आहे . यांच्या नेत्यांन मधे एकमत नाही.कार्यकर्ते आंधळे पणाने आक्रामक होतात. शिवसेनेच्या जुन्या कँपची ट्रेनिंग अजुन उपग्रेड झालीच नाहिये आणि म्हणून साहेबांनी आदेश द्यायची खोटी यांची राज -सेना आक्रमण करीत पुढे सरते मग याचे काय परिणाम होतील याची खंत नाही. किंवा चूक केली अस कबूलही करायचं नाही . खरतर मनसेने आता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर लावण्याची गरज आहे ज्यात यांच्या कार्यकर्त्यांच थोडं ग्रुमिंग करता येईल . वाद म्हणजे काय प्रतिवाद कसा असतो. नैतिक लढाई कशी असते . दादागिरी न करताहि प्रश्न सुटू शकतात . तोड फोड म्हणजेच आंदोलन हि संकल्पना कशी चुकीची आहे . सध्या महत्वाचे मुद्दे कोणते ते कसे हाताळावे इत्यादी इत्यादी . कारण नाहीतर मनसेची दिखाऊ आंदोलक - गुंडगिरी सेना अशी ओळख अधिक गडद होत जाईल आणि याचा नक्की काय परिणाम होतो ते गेल्या निवडणुकीत अख्या महाराष्ट्रात फक्त एक आमदार निवडणून येतो यावरून सिद्ध झालेच आहे .
राज ठाकरें बद्दल-
यांच्या सारखा आक्रामक नेता महाराष्ट्रात असायलाच पाहिजे यात दुमत नाहीच फक्त आता त्यांनी त्यांची रणनीती रिसेट करण्याची गरज आहे. तस बघायला गेलं तर आजही वेळ गेलेली नाही अजूनही ते मराठी माणसाच एकमत करीत मतपेटी गच्च भरू शकतात त्यांच्यात ती ताकद आहे . पण त्यांच्या "उचल मुद्दे सोड" ची पद्धत आधी बंद केली पाहिजे .मराठी पाट्या ,नाशिक मधल काही मोजकं काम त्यांच थेट मनाला भिडणारं भाषण , मराठी माणसा बद्दल ची तळमळ असे अनेक जमेचे मुद्दे त्यांच्याकडे आहेत बस अभी थोड़ा फुक फुक के कदम रखनेकी जरुरत है ......भविष्यात जर का राज ठकारे हे कार्ड चाललं तर अनेकांना ते महागात पडेल असा भाकीत राजकीय विश्लेषक करतायत त्यात नक्कीच पॉईंट आहे. .
ताक -- ज्या ठिकाणी मनसेचे आंदोलन झाले ते मंदीराचे ठिकाण नसुन एक शाळेचे ठिकाण आहे तसेच या फोटोमध्ये सांगीतल्याप्रमाणे हे आंदोलन दादर मध्ये केले गेले नसुन ठाण्यात झाले आहे. याला उपाश्रय म्हणतात जैन धर्मं गुरु इथे थांबतात. जैन समाजात हे ठिकाण मंदिरा इतकंच पवित्र समजलं जातं.
सध्या फेसबुकवर वायरल होत असलेला एका मराठी वृत्तपत्राच्या फोटो क्याप्शन मध्ये ठिकाणाची गफलत झाली आहे. पण याचा अर्थ हे आंदोलन झालंच नाही आणि हा फोटो खोटा आहे असा दावा करण योग्य ठरणार नाही . इतकं होऊनही मनसे थांबली नाही त्यांनी कालच एका गुजराथी सोसायटी समोर श्रावण संपल्याची बिर्याणी पार्टी केली . याला वाद चिघळवणे कि आपली राजकीय डाळ शिजवणे हे आता आपले सुजाण नागरिक ठरवतील कारण अशा राजकीय पार्ट्या आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार घटनेने यांना दिलाय अर्थात मनसे - शिवसेना यांनी कितीही ह्याचं भांडवल केलं तरी यांच्या भूमिका किती संधी साधू आहेत हे आताशी लोकांनी चांगलंच जाणलंय हे लक्षात असूद्यात.
* अशी एका कोणत्याही समाजाची वाढणारी सक्तीची मुजोरी मोडून काढायलाच हवी पण त्याकरिता आपली ताकद एकवटली पाहिजे हे अस एक एका फौजा घेऊन लढाया करता येत नाहीत हे आपल्या इतिहासात स्पष्ट लिहिलेलं वाचण्यात आलच असेल आपल्या सारख्या अभ्यासकांच्या.
© संतोष टाकळे .

क्यालेंडर वाला गणपती ......!


जून महिना संपत आला कि माळ्यावरून गणपतीचा पाट काढून तो पागोळीत भिजत ठेवायचा सकाळी शाळेत जातांना पागोळीत टाकलेला पाट संध्याकाळी शाळेतून येईसतोवर चांगला धुपून निघालेला असायचा. मग त्याला नारळाच्या किशीने घासून लक्ख करायचा आणि सायकलच्या क्यारीयरला बांधून कुंभारवाड्यात गणपतीच्या कारखान्यात न्यायचा सोबत यंदा गणपती कसा हवाय यासाठी क्यालेंडर वर छापून आलेला एखादा फोटो घेवून जायचा . आंजर्लेकर काका पाटाच्या मागे नंबर टाकून त्याची नोंद त्यांच्या चोपडीत करायचे आणि मग सोबत नेलेला reference फोटो निरखत …………दोन चार दा चष्मा वर खाली करत………………… असा हवाय ………… याची सोंड डावी आहे तिला उजवी करावी लागलं ……………सिंहासन असा नाय होणार हा साच्यान करतात आपण हातानं करताव .असा शेम नाय होनार आधीच सांगतोय . आणि हातात हा त्रिशूल हवाय कि मोदक चाललं ………त्रिशूल पण बनव आपण पण तो लोखंडी देवा लागलं …………आणि कलर पण बदललं ………… हे रंग मातीच्या मूर्तीवर बसत नायत लय म्हागातला कलर हाय. तो उंदीर पण लागल नय …………मी जमवता माझ्या हिशोबान पण बाबास ना सांग यंदा जरा भाव वाढल लय काम हाय ह्या फोटोतला गणपती बनवायचा म्हणजे ……………का मी असा जरासा याच्या सारखा दिसणारा बनव त्याला काय जास्ती पैसं वाढणार नायत ………… बोल लवकर बरीच कामा पडलीत …………………ह्म्म्म बनवा मग याच्या सारखा दिसणारा …………तू कालजी नको करूस कसला बनवतो बघ भारी एकदम …………………पाट सोडून परत पायंडल मारत घरच्या दिशने येतांना उग्गाच मनाला लागून राहायचं आपण मोठ झालो आणि कामाला लागलो कि हवा तसा गणपती बनवून घेऊ आता नको उगाच बाबांना वर शंभर - दोनशे टाकायला. जिन्नसालाच लय पैसे लागतात शिवाय डेकोरेशन, लायटिंग अजून बाकी आहे . नको राहूदे आणू मग जास्ती पैसे आले कि त्या क्यालेंडर सारखा गणपती.
पुढे मग ऑगस्ट महिन्यात शनिवारची शाळा सुटली कि संदीप - अमित सोबत कारखाना गाठायचा ……………काका कुठला आमचा गणपती ……………तोंडाला रुमाल बांधून मूर्तीला पॉलिश करता करता ते बोटांन दखवीत त्या लाईन मध्ये हुबेहूब तसे चार पाच गणपती असत मग त्यातला पाट ओळखत नेमका आपला गणपती शोधून काढायचा त्याला निरखत तितंच घुटमळत राहायचं काहीवेळ ………………… क्यालेंडर वाल्या आणि ह्या पाटावरच्या गणपतीत अगदीच किंचित साम्य तेही आपल्या समाधाना खातर ………मग बनवली कि नाय तुझ्या मना सारखी त्या क्यालेंडरवरच्या गणपतीला मागं काढील अशी मूर्ती हाय का नाय बोल? डोंबल आमच्या चेहऱ्या वरचे बारा वाजलेले पाहून ………………. अरे अजून काम बाकी हाय पुढच्या रविवारी ये तेवा रंगवायला घेणार हाय …………काका अहो फक्त २० दिवस राहिलेत लवकर करा जरा ………त्यावर ते ……………अरे बाबा तुझ्या पेक्षा आम्हाला लय काळजी हाय चला निघा आता .
पुन्हा पुढचा रविवार जाऊन रंग लावून झाला की नाय याची खात्री करुन घ्यायचो आम्ही ....अगदी गणपती बसायच्या आधी डेकोरेशनच सामान आणायला बाजारात गेलो तरी चक्कर टाकायची…………….काका जरा इथ कलर मारा, मोदक अजून जरा पांढरा करा, ह्या मागच्या केसांना रंगच लागला नाय , पितांबराचा काठ अजून सोनेरी पाहिजे होता . इत्यादी इत्यादी ………आंजर्लेकर काका पार वैतागायचे पण मग लावतो बाबा धीर धर नायतर एक कर हे कलर घे आणि तूच फास हवेत तशे.........खरतर त्यांना त्रास दयायचा उद्देश् नासायचा पण यात भारी गंमत होती .
मागच्या वर्षी गणपती आणायला गेलो तेंव्हा आंजर्ले कांकानी विचारल …………………. काय मग आता मोबाईल मधल्या फोटोसारखा गणपती बनवून देऊ काय बोल पुढच्या वर्षी ……………त्यावर फक्त निव्वळ हश्या पिकला त्या आठवनींन वर ………………ते दिवस होतेच वेगळे तेंव्हा वेळ होता पण पैसे नव्हते. आज पैसे आहेत पण वेळ नाही . त्यातही कधी तेंव्हा बाबांनी दिलेले पैसे कमी पडले तर ग़ुपचुप् साठवलेल्या पैशाचा डबा फोडून आणिक साहित्य आणायच ..... एक एक कागद नक्षीदार कापत रात्र रात्र जागुन पताका नक्षत्र माळा लावित आरास करण्याच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. हल्ली कामामुळे गणपतीची तयारी सोडा पण प्राणप्रतिष्ठापना करायाचाहि मुहूर्त गाठता येत नाही .लाहना भाऊ Lavesh Jadhav बाबांच्या मदतीन सगळी आरास करतो......तशी त्याची हौस अजूनही तितकिच दांडगी आहे. म्हणून कुठ आमच्या गणपतीला घरगुती मखरात बसण्याच भाग्य लागतै नाही तर आमच्याकाळात कदाचित ऑर्डर देवून आरास करावी लागेल बहुदा ...... असो
काल जिगरी यार Prasad Yashwant Surve सोबत सेन्ट्रल रेल्वे मैदानात मुंबईकर गणपतीच्या मूर्त्या पाहतांना त्या दिवसांची याद पुन्हा उफाळून आली आणि आनंदा सोबतच मोठ् झाल्यावर ह्याव करू आणि त्याव करू असली फुशार्कि कशी पोटा पाण्यासाठी घर दार सोडून आल्यावर बोम्बालली याची खंतही वाटून राहिली पण जगण्यासाठी पैसा आणि पैशासाठी काम हे गणित तस कोलमडुंन चालणारं नाय...... गड्या तू काय वर्षातून एकदा येतोस बाकि दिवस आमच जोखड़ कोण ओढ़णार बाबा.

© संतोष टाकळे .

उसन्या पुढाऱ्याची गरज नाही..........!


            


ज्या मराठ्यांना साक्षात छत्रपतींच "राजे" पण लाभलंय त्यांना कोणत्याही उसन्या पुढाऱ्याची (हार्दिक पटेल .)गरज नाही . असली हंगामी बेडकं कितीही फुगली तरी मौसम गेला कि त्यांना पुन्हा बिळातच जावं लागतंय ……………आम्हा मराठ्यांचे नेतृत्व करण्यास आम्ही समर्थ आहोत . आणि आरक्षणाची अशी कितीही गाजरं आता संधी साधू पुढे करण्याचा प्रयत्न करीत असले तरी तेच गाजर त्यांच्या XXX घालण्याची हिंमत आणि योग्य समज नव्या तरुण पिढीकडे आली आहे . मुळात आम्ही कधीच अमुक जात तमुक धर्माच्या नावाने कोकलत नाही. त्याबद्दलची सहानभूती मिळवत नाही. आणि शिवाय त्याचं भांडवल करीत स्वतःची पोट भरीत नाही. एक वेळ ते आरक्षण नाही मिळालं तरी चालेल पण लाचार होत कुण्या शेळपटाला आम्ही आमच्या उरावर बसू देणार नाही . 
खरं तर आता आरक्षण हटाव साठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय . आजोबा - बाबा - पोरगा - नातू आणि आता पणतू ……………… एका एका घरात सात - आठ सरकारी नोकरदार होऊनही जर उद्धार होत नसेल तर हे तुमचं अपयश आहे . ज्यांनी मिळवलं ते पुढे बळकावत राहिले ……………आणि अजूनही ज्यांना सिस्टीम मध्ये येता आलं नाही ते उपेक्षितच राहिले जे समाज प्रबोधनाच्या नावाने बोंब मारतायत त्यांनी या उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी का? पुढाकार घेतला नाही . कारण यांना स्वतःच्या उपसेगीरीतून उसंतच मिळाली नसावी . किंवा मग सगळेच मुख्य प्रवाहात आले तर मग पुढे कशाचं भांडवल करावं याची भीती वाटली असावी.

आज आरक्षणामुळे जी तफावत समाजात जाणवते आहे . त्यातून जाती द्वेष अधिकच वाढत जाणार आहे . तब्बल ९६ टक्के असूनही जेंव्हा फक्त open म्हणून प्रवेशाची संधी हुकते त्या बुद्धिवंत मेहनती मुलावर झालेला अन्याय ………. अन्याय नसतो का ? पुढे तो निराशेपोटी पुन्हा पुस्तकांशी वैर घेत खच्चून जातो याला आपल्यालेखी काही किंमत नाही का ? आर्थिक परिस्थिती बेताची असतांना फक्त उच्च वर्णीय जात म्हणून शैक्षणीक फी मधली सूट घेता येत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावं लागणाऱ्या त्या हजोरो मुलांशी आपली बांधिलकी नाहीच का ? आमचा समाज - आमची जात - आमचा धर्म आणि आमचं आरक्षण याचे ढोल बडवत हि सामाजिक विषमता अजून किती वर्ष भारताच्या संविधानाचा आधार घेत आपण रेटणार आहोत . याच उत्तर द्या आधी …

© संतोष टाकळे .


प्रादेशिक माध्यमांची मो'ड 'की मराठी …………!




हल्ली मेजर मराठी वाहिन्यांवर महत्वाच्या बातम्या देणारे" अ "मराठी वार्ताहर मराठीचा जो "तोडभंग" करता आहेत. तो आता सहन करण्यापलीकडे आहे. मुळात अगदीच चुकीचं व्याकरण ……………त्यातही सर्रास वापरले जाणारे हिंदी आणि इंग्रजी शब्द त्यामुळे हि आपली मराठी नसून परप्रांतीय म्हराटी असावी असा संभ्रम तयार होतोय. जे मराठीचा सार्थ अभिमान असल्याचं अधोरेखित करीत आपलंच च्यानेल किती अस्मिता बाळगून आहे याचा वारंवार दाखला देतात. त्या संपादकांनी तरी किमान याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अहो नसतील मराठी माणसं तर ती तत्काळ भरा पण असले मोडक्या जिभेचे मराठीचे कंत्राटदार सोसणे कठीण झाले आहे.

आता हेच तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश वाहिन्यांना तोडकी हिंदी किंवा मोडकी इंग्लिश पुरवून पहा ……… because of language barrier च्या करणा खातर त्याच दिवशी संध्याकाळी हातात मेमो मिळेल . मराठीत मात्र ये सब कुछ चालता है यार …………म्हणीत जे रेटलं जातंय याउलट इतर भाषिक माध्यमात हे अजिबात खपून घेतलं जात नाही. हि आपल्या वरवरच्या आणि त्यांच्या कट्टर भाषा प्रेमातली तफावत आहे. आता यावर तुम्ही talent महत्वाचं भाषा doesn't matter म्हणीत हा मुद्दा खोडून काढणार असाल तर कृपया आपण योगेश दामले ( Ex Reporter NDTV India ) या मराठी पत्रकाराच हिंदी वरच प्रभुत्व पहा . हा पठ्या कुमार - पांडे ना टोटल टफ देऊ शकतो. बाकी हिंदी मध्ये पूजा सामंत , साहिल जोशी , प्रसाद काथे ,तर इंग्लिश मध्ये राजदीप सरदेसाई , योगेश पवार , संतोष आंधळे , कैलास कोरडे , असे बरेच मराठीजन त्यांच्या talent मुळेच आज तिथे स्थिरावलेत.

बाकी आपण ज्या मध्यमासाठी काम करतोय त्या माध्यमाचा लेहजा , त्याची प्रमाण भाषा आणि विश्वासार्हता जपलीच पाहिजे यात शंकाच नाही . आणि इतकी वर्ष या प्रांतात राहून आपण किमान बोलण्या लायक मराठी शिकलो नाही याची "लाज" वाटलीच पाहिजे यात वादच नाही.

© संतोष टाकळे .

मायेन रग्गड श्रीमंती असलेली माणसं .................!

गावी आईनं चुलीवर तवा ठेवला कि लगेच ताट घेऊन तिच्या पुढ बसायचं थाल्यातल्या पिठाला दोन हात मळत ………गोळा थापीत तिच्या बोटांचे ठसे उमटलेली भाकरी तव्यावर पडली कि मग भाजीचा रस्सा वाढायला घ्यायचा ………………… आई काळ्या वाटण्याची उसळ ………. सहीच ना ………………भाकरीला पाणी लावत मग तिनं म्हणावं हो तुला आवडते म्हणून मुद्दाम केली . वाटीभर रस्सा मग मनसोक्त तृप्त होऊन खातांना तीनं आठवणीन आपल्यासाठी प्रेमानं बनवलेल्या त्या रश्यात मसाल्यांच्या फ्लेवर पेक्षा तिच्या मायेच्या हाताची चवच अधिक चीभेवर रेंगाळत राहते . आणि कित्तेक दिवसात पोट तुडुंब भरल्याचं समाधान सुखावून जातो . आज पुन्हा तसा योग आला निमित्त होतं मातृतुल्य असणाऱ्या मीनाक्षी मॉम ने पाठवलेल्या सरप्राइज टिफिनचं

त्यांच्या हातच्या मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत हाणणं म्हणजे डब्याचा तळ पुसून खाण्याइतपत चा हवरटपणा …………… कधी काळी एकत्र काम करीत असतांना त्यांच्या टिफिन मधली हि रेसिपी इतकी फेवरेट झाली कि पुढे कामाचं ठिकाण बदललं तरीही दर भोगीला दोन भाकऱ्या आणि भाजीचा हाक्काचा डबा ऑफिसला पोहचता होई. गेल्या संक्रातीला चुकलेला डबा ………… बर्थडेच निमित्त साधीत आज पोहचता झालाय .तीच authentic टेस्ट सोबत या बेभरवशी मुंबापुरीत दुसऱ्या आईचही तितकंच निखळ प्रेम त्यात कठोकाठ भरलेल……… प्रत्येक घसागणिक जिभेवर जाणवत होत. मुळात या धावत्या शहरात स्वतः साठी वेळ नसतांना कुण्या मानलेल्या मुलांसाठी दोन भाकऱ्या थापणारी हि माय कायम हाक्काने माझ्या मागे उभी राहते. चुकलो तर कान पिळते ………काही मिळवलं तर भरभरून कौतुक करते . कधी आजारी असलो तर डोळ्यांच्या कडा पाणवे पर्यंत हसवते ………………आणि महत्वाचं म्हणजे निस्वार्थी निखळ खरं प्रेम करते . अनेकदा माणस नुसती शब्दांन जोडली जातात आणि मग त्यांचं रूपांतर अशा घट्ट नात्यात होत.
कधी कधी रक्ताची नाती वैरी होत जीवावर उठतांना पहिली कि असल्या जोडलेल्या नात्यांचा हेवा वाटतो .शेवटी पैसा - जमीन - संपत्ती मिळेलहि वारसा हक्काने पण अशी मायेन रग्गड श्रीमंती असलेली माणसं भेटायला मात्र खरचं भाग्य असावं लागतं .

"MoM"

Thank you so much for all your love and support throughout my life. 

"खळखळ "लंडनच्या घरासाठी …………!








लंडन मधल डॉ . बाबासाहेबांच ते घर घेण्यासाठी कुणाचाच आक्षेप नासवा कदाचित नसेलही. पण ह्या घराभोवती राजकारण आणि त्यावर उथळ चर्चा कारणाऱ्यांनी जरा आपल्याच देशातल्या स्मारकांचा आढावा घ्यायला हरकत नाही .

बाबासाहेबांनी समतेचा संदेश देत महाड़च्या ज्या चवदार तळ्यातलं  पाणी ओंजळीत घेत सगळ्यांसाठी खुल केल.त्या स्मारकाची आजची स्थिती काय.......एकेकाळी ज्या पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह झाला . त्याच पाण्याचं आज काळ्यापाण्यात रूपांतर झालय. याच आवारात असलेल्या ऑडिटोरीयमच्या दरवाज्याला जास्ती वेळ टाळ लोंबकळलेल असत. अस्वछता आणि बाकि इतर नॉन मेंट्नन्स गोष्टींची तर यादिच देता येईल. काही उपवाद वगळता अशीच काहीशी अवस्था देशभरातल्या अन्य स्मारकांची आहे थोड़क्यात काय तर जे आपल्या हातात आहे तेच आपल्याचानी सांभाळता येत नाही तर त्या लंडनच्या घराच काय करणार आहोत आपण ?

 आजच्या  यावरच आधारित असलेल्या एका वुत्तवाहिनीच्या चर्चा सत्रात हे घर घेतल्याने  सामान्य आंबेडकरी जनतेत नेमका काय  संदेश जाईल ? या प्रश्नाला अभ्यासु विचारवंतानी दिलेल उत्तर नेहमी प्रमाणे भावना प्रधान होतं.

मुळात इंदु मिल मधल प्रस्तावित डॉ .बाबासाहेब किंवा छत्रपति शिवाजी महाराजांच त्या अरबी समुद्रात वैगरे जे स्मारक बांधण्याचा आपण करोडो रुपये खर्ची घालण्याचा घाट घालतोय त्या पेक्षा महाजांच्या पावन स्पर्शाने इतिहासात अजरामर झालेल्या रायगडावर तो काळ पुन्हा तसाच उभा करणारं एक उत्तम जागतिक दर्ज्याच भव्य स्मारक का नाही उभारू शकत . त्या अरबी समुदातल्या खडका पेक्षा पराक्रमी रायगडचे स्वराज्याची साक्ष असलेले भक्कम बुरुज जास्ती उजवे नाहीत का ? इंदू मिल - अरबी समुद्र आणि स्मारकं यांच्या अस्मितेच्या उपऱ्या भांडवलावर येत्या पुढील काळात किती निवूडणुका होतील हा पाहण्याचा विषय आहे . 

अहो हे सगळच ठेवा बाजूला आदि त्या गावाबाहेर आजही पोटा- पाण्यासाठी , याही काळात मानान उभ राहून समाजात खंबीर पणे वावरू न शकणाऱ्या  , अन्यायाच्या जोखड़ाखाली दबलेल्या- पिचलेल्या आंबेडकरी आणि इतर उपेक्षित बांधवांना आपण कधी या व्यापातुन बाहेर काढणार आहोत.

जितकी धडपड आणि खळखळ लंडन च्या घरासाठी आहे. त्यातली किंचितशी तळमळ इथल्या वस्तितल्या उंबऱ्याशी पोहचावी हि माफक अपेक्षा .............बाकि देशी -परदेशी आपला डंका वाजलाच आहे. …………………बोलो बजा कि नही ?

© संतोष टाकळे .

* फोटो सौजन्य - ABP MAZA News Network 



उशिरा सुचलेल्या अक्कले खातर................!


ये चला लवकर लवकर थर लावा .....रेन डान्स....... रेन डान्स .....बस बस बाकी बरीच मंडळ खोळंबली आहेत......... ताड़वाडिचा गोविंदा तुमच्यान जमतय का? की दुसऱ्या मंडळाला बोलवु.......कशाला टाइम पास करताय हो ……………. बाजूला व्हा तुमच हजेरिच पाकिट घेवून जा ...........वा … वा कसला भारी प्रयत्न बाल गोविंदा 9 व्या थरावर चढ़ताना .....माध्यमांच्या प्रतिनिधीनी जरा हे ही दाखवा (स्वतः च्या मालकीचे मिडीया हाउस असल्यागत ऑर्डर देत ) काय डेरिंग असते या खेळात .....वर पाच मिनिटांची अति शानपणा शिकवणारी वायफळ बड़बड़ ......चेहऱ्यावर सत्तेची गुर्मी , पैशाचा माज , वागण्यातला बड़ेजाव थाट आणि तरीही आपले गोविंदा पथक लाल गाळीत ट्रक -लॉरी- बसी करून असल्या माजलेल्या लोकांच्या दारात गोंडा घोळत पोहचतात . खरतर पहिल्यांदा यांना अक्कल आली पाहिजे. त्यांन लाख वाटायला काढले असतील म्हणून आपण हजार जमवायला जायच भिकाऱ्या गत.
मुळात ज्यांना यापूर्वी कुणी धुप घालून विचारीत नव्हतं आज ते वेल नोन चेहरे झालेत. कशी प्रसिद्धी मिळेल या पेचात असलेल्यांनी अकलेपेक्षा उंच हंडया बांधल्या आणि कल्पनेच्या आयडियाची चांदी झाली.घाटकोपरला सर्वात उंच दाहिहंडी बांधणारा कीर्तनकार पुढे तिकडूनच आमदार म्हणून निवडून होतो .पब्लिकच्या चंगळ आणि श्रद्धेला इंनकॅश करीत शिर्डी पंढरपूरच्या मोफत यात्रा - आणि रिसोर्ट फार्म हाऊस च्या जंगी ओल्या पिकनिका आयोजित करणाऱ्या भाऊला आपले इमोशन्स बेस शीघ्र गंडी लोक्स त्याच्या गुनगाणाचा पिठ्या पाडीत अधिक मोठ करतात.कि भविष्यात विक्रमी मतांनी निवडून देत भाऊच्या गळ्यात मंत्री पदाचा बहुमान देखील मिळवून देण्याची यांची ताकद असते.

किमान ह्यावेळी तरी बऱ्याच उशिरा सुचलेल्या अक्कले खातर पाऊस -शेतकरी असे हायीप असलेले TRP बेस मुद्दे पुढे करीत ठाणेवाला कोकलणार नाही हे दिलासा देणार आहे . 

पण अजुन वरळी वाला ,घाटकोपर वाला , चेंबूर वाल्यांना साहेबांचा निरोप पोहचलेला दिसत नाहिये . कदाचित त्यांनाही येत्या काळात पाझर फुटायची दाट शक्यता आहे. 
.आता इतक्या वर्षात राज्यात यांची सत्ता आणि सोबत केंद्रीय कृषी खातं हातात असूनहि ज्यांना शेतकर्यांच भल करण जमल नाही. तेच साहेब कनवाळू होत शेतकऱ्यांसाठी बांधावर उतरले म्हटल्यावर पक्षीय निष्ठावंत नेत्यांच्या पापण्या ओल्या झाल्या नाही तर नवलच.

© संतोष टाकळे .

* फोटो सौजन्य - दैनिक लोकसत्ता. 

आक्रोशाच इव्हेंटीकरण………….!








डॉ.दभोलकरांना मारणारी आणि कॉ.पानसरेंची हत्या करणारी विकृत माणस आपल्यातलीच आहेत.किंबहुना अनेकांना या बाबतची नेमकी माहिती असण्याची शक्यता आहे .यंत्रणा सफशेल अपयशी ठरतेय हे मान्य पण मग किमान ज्यांना यातला धागा दोरा माहित आहे त्यांनी पुढे येत गुन्हेगारांना पकडून देण्यात पुढाकार घेतला पाहिजे . मुळात हा विचारांचा खून आहे .हे असले उद्योग आपण सहन करीत गेलो तर अशा आतंकी लोकांच धैर्य अधिक वाढत जाईल. 

नुसत्या तिथीला या विचारवंतच्या हत्येचा आक्रोश व्यक्त करीत त्यांच इव्हेंटीकरण घडवीत . मेंणबत्या पाजळीत फिरण्यात काय पॉइंट आहे . दाभोलकर गेल्यानंतर दोन वर्षात नेमकं काय विधायक काम आपण केलय याचा प्रसार व्ह्ययला हवाय ,किती वेळा सरकारला धारेवर धरित या तपासा संधर्भात जाब विचारलाय याच्या बद्दलचे अपडेट लोकांना दिले पाहिजेत , माणूस मारला की त्याचे विचारही मारले जातात ही अंधश्रद्धा खोडून काढली पाहिजे ,तथाकथित लोकांना लुबाडणाऱ्या ढोंगी बाबा -मातांना जेरबंद करण्यासाठी आपण आग्रही असल पाहिजे .माध्यमांना चर्चेचे गुराळ पुरवण्यात, फोटो क्यांप्शन स्टोरीज क्रिएट करण्यात आणि चला हवा येवूद्या च्या सेट वर भावनिक होत आपण जो माहोल तयार करतोय तो डॉ दाभोलकरांना कधीच अपेक्षित नव्हता .

सर तुमची प्रत्यक्षात कधीच भेट झाली नाही पण सतत तुम्ही तुमच्या लिखणातून भेटत राहिलात. 
आज व्ययक्तिक आयुष्यात कर्मकांडाना नाही म्हणण्याच बळ तुमच्या मुळेच आलाय .


हीच काय ती तुम्हाला श्रधांजली............! 

© संतोष टाकळे .

भूषणाच लॉबिंग .........!


"आपल्याकडे आधी वाद - प्रतिवाद आणि मगच मिळेल पुरस्कार " असा नवा ट्रेंड सेटल होतोय . यात अभ्यासकां पासून ते नवख्या प्रसिद्धी वलयात थोडे उजळ झालेले लोकही भरभरून बोलतांना दिसतायत. त्यात आता आपल्याकडे राजकारण्याचा मुलगा राजकारणी च्या चाली वर सामाजिक कार्यकर्त्याचा वंशज समाजवादी वैगरे असं उत्तम घराणेशाहिच्या बेस वर सगळं सेट होतांना दिसतंय आणि अशा चर्चेत आता नवे चेहरेही वारसा हक्काने बोलतांना दिसतायत . "पुरंदरें" यांना महाराष्ट्र भूषण देऊ नये या मागणीत मोजके चार दिग्गज सोडले तर बाकी सगळेच न्यू कमर्स आहेत. इतकंच काय तर "मलाला आणिक "सत्यार्थी" ना नोबेल मिळाल्यावरही यापैकी अनेकांनी तोंडसुख घेतल.

एकंदरित आपली सन्मान देण आणि घेण या बद्दलची संकुचित मानसिकता, राजकीय हस्तक्षेप, विचारवंतांची लॉबिंग , टार्गेटीकरन अशा अनेक गोष्टी नव्या वादांना जन्म देतात वा निर्माण करतात . आणि आपल्या या धसमुसळ्या गोंधळात आपण सर्वोच्च बहुमानाच्या प्रतिष्ठेच्या आणि अभिनामाच्या सन्मानांच गांभीर्य घालवून बसतो आहोत. हे ज्यांच्या लक्षात येतंय तेहि मुग गिळून गप्प आहेत हे जास्ती विदारक चित्र आहे.


तो पुरस्कार राहिलाय एका बाजूला आणि आपण एस्ट्या जाळतोय ,एकमेकांच्या जाती चा उद्धार करतोय , कुणी पान भर बॉल्ग लिहत त्याचा समाज किती योग्य बाकी कसे अयोग्य याची तुलनात्मक मांडणी करतोय , आगलावे बारामती कर वातावरणात अधिक उष्मा घलतायत, राज ठाकरे स्पेशल मुलाखती देतायत , मिडिया उथळ चर्चा घडवयतायत ,उशिरा का होईना संजय राऊत ही सामना करायला पुढे आलेत , बाकि पेड़ विचारवंत त्यांच्या त्यांच्या क्षमतेने कोकलतायत , सोशल नेटवर्किंगवर तर अक्षरशः उत आलाय.

पण या निमित्ताने अनेक कट्टर चेहरे मात्र उघडे झालेत. त्यांची नेमकी वैचारिक पातळी किती हेही सिद्ध झालय. पुरोगामी म्हणणारे कसे चतुर संधी साधू आहेत याची प्रचिती आलीय.
पन तरी महाराष्ट्राच जे जगभर हसु झालय त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत.
ज्या महाराजांनी या मुलखाच्या इब्रति खातर रक्त सांडल त्याच महाराजांच्या इतिहासाचे वाभाड़े काढित काही टोंनगे जो आतंक मजवता आहेत त्यांना ठेसल पाहिजे कसले ब्रिगेड चलावतायत हे खंडणी खोर ..........यांची खरतर लायकी नाही महाराजांच नाव घेण्याची.
पण आज अत्यंतीक वाईट वाटतंय मराठी विशेष करुन महाराष्ट्रियन म्हणून हा इतक्या खालच्या लेवलवर गेलेला वाद आणि झाला प्रकार पहतानां
.
शेम ऑन यु डर्टी मांइड महाराष्ट्रियन्स

© संतोष टाकळे .

गटारी





खालीदकड मटन आणायला बाबांच्या सायकलवर सकाळी ५ च्या सुमारास फणसाच्या वाकणातून मार्केटच्या दिशेला जातांना. आज मटण या नुसत्या कल्पनेने तोंडाला पाणी सुटलेलं असायचं . बाबा दोन नळ्या घेऊया हा  …………कलेजी वेगळी मागा ……२ किलो कसं पुरेल ३ किलोतरी घ्या ………असा हवरटपणा चालू असतांना बाबा मात्र सायकल पळवत रस्ता कापत असायचे थोडा उशीर झाला तरी गर्दी वाढेल हवं तसं मटन मिळणार नाही या काळजीत ……………आम्ही मार्केटला पोहोचायचो तेंव्हा खालीद चाचा पहिला बकरा कटवायची तयारी करीत असायचे . शब्बीर पानी ले बेटा ………चल जादा टाईम निकालू नक्को ………सलटादे जल्दी ……५ एक मिनिटांत बकऱ्याची एक ओरड कानावर पडायची आणि मग मोजून १५ मिनिटात निथळणारा बोकड शब्बीर अकड्यात उलटा लटकवायचा. 

खालीद चाचा अल्लाचं नाव घेत पहिला घाव घाली आणि मग लायनीत उभ्या असलेल्या २०-२५ जणांच्या  किलो वारी पिशव्या पुढे होत . कुणाला चापच हवेत तर कुणी इतनी चरबी मत डालो चाचा म्हणीत वाद घाली . आणि १० वाजायच्या आत बोकडाचा बाजार उठत असे ……………………खालीद चाचाने माझ्याकडे बघत ……मेरे बच्चेकू ये थोडा जादा कलेजी म्हणत दिलेला extra काळजाचा एक कोपरा आई वेगळ्या टोपात शिजवी …………….मटन- वडे यांच्या दर्पान  घरभर पसरलेला गटारीचा माहोल त्यात बाहेर कोसळणारा धो - धो पाऊस ……………संत्री -नारंगीची एक कॉटर  मारून रंगात आलेल्या अण्णांची जुनी गाणी चुलीच्या निखाऱ्यात भाजलेल गावटी कोंबडीची खरपूस कलेजी असं बरंच काही आजही कोकणात होत असतं ……………फक्त आपण तिथ नसल्याची हुरहूर लागून राहते. शिवाय  इथल्या शहरातल्या मटणातल्या चवीत कितीही ब्रांडेड मसाले घाला त्या गावच्या चवी इतकी रियल टेस्ट इथ मिळत नाही. कारण गटारी शिमगा निमित्त मात्र आहेत खरं तर आपल्या माणसां सोबत दोन घास समाधानान  खावं ह्यात खरा आनंद दडलेला आहे नाही का ? 

© संतोष टाकळे .


Note - आज दिवसभर गटारीच्या शुभेछ्या देणाऱ्यां मित्रांना  हि पोस्ट समर्पित

BAN - बाबा - माता @ इंडिया ……………!


सुमारे १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट दुपारच्या मध्यानं प्रहरी टाळ मृदुंगाचा गजर कानावर पडला आणि इतक्या भर उन्हात रस्त्याने नेमकं काय निघालय हे बघायला लोकांची गर्दी अंगणात कुंपणाच्या कोपऱ्यावर जमली . तब्बल ५० एक जणांचा ताफा पुढे चाललेल्या तीन माणसांच्या हातात सोनेरी फ्रेम असलेले फोटो दोन माणसांचे एक बाईचा तिघंही राजबिंड वर्णाची त्या फोटोतल्या बाईंच्या अंगावर भरजरी साडी ,नाकात थोरली नथ , ओठाला भडक लाल रंगाची लिपस्टिक , कपाळावर चंद्र कोर, केसात गजरे आणि गळ्यात ठसठशीत दागिने , मधला फोटो विरप्पन सारख्या मिश्या असणाऱ्या माणसाचा त्याच्या मागे रुद्र अवतारातला हनुमान पुढे हा सलमान स्टाईल पोज देत उभा असलेला,मागून दिव्य प्रकाश वैगरे दाखवलेला , आणि शेवटच्या फोटोत एक गोंडस प्रसन्नं चेहरा असलेला मध्यम वयीन माणूस त्याच्याही मिश्या थोड्या वळणदार आणि एक मध्यम वयीन त्याच्या एकंदरीत लुकला बघून त्याच्याकडे दिव्य शक्तीचा आभाव असल्याचं  जाणवत होतं . या तिन्ही तस्बीरींना वरून केशरी चंदनाचा नाम लावलेला , मंद वासाच्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा हार घातलेला शिवाय वर वेल्वेटच्या नक्षीदार शालीच उपरणं त्या काळच्या वैरागी बाबांच्या जमान्यात अशा आय कॅन्डी धार्मिक गुरूंच्या ओजस्वी दर्शनाने रस्त्याच्या दुतर्फा जमलेले लोक हात जोडत होते . कुणी त्या ओळींन चाललेल्या भक्तांना निरखुन न्याहळत होत . तर कुणी कोण ही नवी महाराजी  फ्यामीली अशा संभ्रमात पडलेला तस अजुन विशेष आकर्षण म्हणजे या ताफ्यातल्या बऱ्याच जणी निट्सर साड्या नेसलेल्या फोटोतल्या त्या गुरु बाईंशी काहीसं मिळतं जुळतं म्हणजे लिपस्टिक , कपाळावर चंद्र कोर, केसात गजरे आणि गळ्यातले ठसठशीत दागिने वैगरे वैगरे , पुरुष मंडळीही अगदी निट नेटकी उंची कुर्ते घातलेले वैगरे ……………१५ एक मिनिटांत हा ताफा पुढे सरकता झाला. पण अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा दुखी:तांचे दुखं: तोच हारी ………अशा मंत्र घोषाच्या नामस्मरणाने अवघा माहोल अध्यात्मिक झाला . आणि या नव्या महाराजांच्या चमत्कारांच्या आणि त्यांच्या लीलेच्या भाकड कथांना उत आला . बायका काय बाय चढवत अधिक रंगवत चर्चेत उत्सुकता आणीत होत्या शिवाय ज्यांच्या घरी ह्या बापूंच्या, त्यांच्या गुरुपत्नीच्या आणि गुरुबंधुच्या तस्वीरी आल्या होत्या ते गावातले तसे प्रतिष्ठित सदगृहस्त म्हणजे सहाजिकच विश्वास अधिक दृढ होणार यात शंकाच नाही.
पुढे हा सत्संग ४ दिवस चालला गावातले अनेक सामान्य आणि नामवंत लोकांची दर्शनाला रीघ लागली . यजमानांनी येणाऱ्या प्रत्येकाला चहा ,नाश्ता, आरतीच्या वेळी विशेष प्रसाद म्हणून साजूक तुपातल्या शिऱ्याच्या पुड्या , विभूती , गुरुजनांचे पूजेला लावता येतील असे दिव्यप्रकाश रहित फोटो , त्यांची महती प्रकट करणारे चालीसा , मंत्रांची पुस्तके असं compact रिटन गिफ्ट म्हणून दिलं .जे गावात अनेकांनी देवघरी प्रतिष्ठपिठ केल्याचं आठवणीत आहे ...... त्यातल्या त्यात इथ येणाऱ्या आणि अगदीच खास असणाऱ्या VVIP पुरुष दर्शनार्थीला बापूं -माई- दादांच्या फोटो समोरचा नारळ , हार , फळ, शेला किंवा महिला VVIP नां माईंना घातलेला गजरा- वेणी वैगरे देत त्यांना उत्सवपीठाधीन यजमान आणि त्यांच्या सौ कृतकृत्य करतांना आमच्या सारख्या अतिसामान्य भक्तांच्या नजरेत हे आपल्या नशिबी का नाही? याची खंत प्रखरपणे जाणवत असे. बर शिवाय यात प्रशासकीय , शैक्षणिक, वैद्यकीय , राजकीय क्षेत्रात बहुचर्चित असणऱ्या व्यक्ती असल्याने कुतूहल अधिक जास्ती शिगेला पोहचणारं .
एकुण चार दिवसांचा सत्संग , भजन ,आरत्या , नामस्मरण अशा अती भारावलेल्या या अध्यात्मिक उत्सवाला रोज भरगोस गर्दी करणारे अनोळखी चेहरे हळूहळू ओळखीचे होतात मग त्याची गट्टी जमते पुढे ते बापू -माई भक्त म्हणून सदमार्गी होतात . आणि तस्बीरीं आणताना असणारा ५० जणांचा ताफा आता २०० च्या वर संख्याबळ गाठतो . शिवाय इथ येणाऱ्या कुणाकुणाचे किती प्रॉब्लेम या नव्या ओळखीच्या माध्यमातून मार्गी लागतात. आता सामान्य बापू भक्ताच्या मदतीला सिस्टीम मधला बापू भक्त उभा राहिला म्हटल्यावर आणिक काय हवे . भक्तीच्या या प्रवाहात अनेक नवे चेहरे येत राहतात त्याचंही   कल्याण होत राहतं पुढे भक्तीच्या या गर्दीत हळू हळू कमर्शियल गोष्टींचा  शिरकाव होतो मग त्यात एकरोंच्या परिसरात पसरलेले आश्रम , बापू माई यांच होम प्रोडक्शन असलेली पुस्तकं , पोथ्यां , सोन्या चांदित मडवलेले लॉकेट्स,अगदी दंतमंजना पासून ते अंगाच्या साबणा पर्यंतची दुकानदारी  भक्तानां लुटण्याचा व्यवसाय सुरु करतात याचं रीतसर कंत्राट काही खास लाल गाळू भक्तांच्या पदरी पडतं आणि पैशाचा ओघ बाबा मातेंच्या दिशेने वळता होतो . सोबत  हजारोंच्या बोलीत होणाऱ्या पादपूजा , महारुद्र अभिषेक , चंडीयज्ञ आणि आता राधे माँ च्या जनरेशन मधे पप्पी, झप्पी , गोदीत घेणं फ़िल्मी गाण्यांवर नाचण खिदळणं वैगरे वैगरे .
आक्षेप असा कि पैशाचा पाऊस पाडणारा हा धंदा जेंव्हा राजरोसपणे चालू असतो तेंव्हा नेमकी आपली यंत्रणा काय करीत असते . राधे माँ , आसाराम , नित्यानंदा या भोदुंच्या मुसक्या आवळणे आपल्याला आधी का शक्य झाले नाही. हा कसला भक्तिचा बाजार भरलाय त्याची चौकशी का केली जात नाही.  वा आताही त्यांच्यावर कार्यवाई करण्या करिता इतका विलंब का लागतोय? याचं कारण भारतात चमत्काराला तत्काळ नमस्कार करणाऱ्या मूर्ख लोकांच लाक्षणिक संख्याबळ आहे . त्यांच्या धार्मिक भावना लागलीच दुखावल्या जातात . कहर म्हणजे काहीजण तर बाबा -माता -गुरुमाँ यांच्या आश्रमाबाहेर सशत्र त्यांच्या बचावार्थ मार्शल च्या रोल मधे उभे ठाकतात हमारी जान  लेलो लेकिन हम आपको बापू को हात लगाने नाही देंगे इतक्या आवेषांत यांची भक्ती उफाळून येते हे आपण या पूर्वीही पहिलच आहे ………………पण तरीही आपण मात्र नेहमी प्रमाणे प्रशासनाच्या नावाने शिमगा करीत बसतो  पण खरतर त्यापेक्षा आपल्या मानसिकतेच्या बुरसटलेपणावर थोडा विचार केला तर . आपल्याला नेमकं उत्तर सापडेल. नाहीतर आता फ़ोर्स ने चालू असलेल्या मेजर ब्रेकिंगस् मग पुढे थोडक्यात बातम्या झाल्या कि लोक हा प्रकार विसरणार हे ज्यांना माहित आहे त्यांचे बाजारू दरबार यापुढेही खुले होत राहतीलच आपल्या भारतीय डोळेझाकू भक्तांच्या कल्याणार्थ. 

© संतोष टाकळे .

Note - वरील लेखाने कुणाच्याही अध्यात्मिक भावना दुखावल्या असतील तर त्यांनी तात्काळ क्षमासहत्र मंत्र किमान १० वेळा म्हणावा राग तर शांत होईलच आणि मनही प्रसन्नं होईल यात शंकाच नाही.