आयुष्य तेच आहे ………



काल मातोश्री वृद्धाश्रमातून निघताना ज्या गाण्याच्या ओळी सहज मनात आल्या त्या ……

रूठ के हमसे कभी जब चले जावोगे तुम 
ये न सोचा था कभी इतना याद आवोगे तुम ...... 

चहरे जितक्या प्रभावी बोलतात . ते समजून घ्यायची शक्ति मात्र अपुरी अणि मर्यादित आहे. जे काल प्रकर्षानं जाणवलं , मोह - माया- ममता यांची भूक अनुभवतांना जगणं किती अदभूत आहे याची प्रचीती आली. मातोश्रीच्या प्रांगणात हिरवळीवर सांडलेले पाण्याचे थेंब जितक्या अनिश्चित स्वरूपाचे आहेत. तसंच काहीसं इथल्या हर्षील जगण्याचं आहे. मऊशार गादीवर अंग टाकल्यावर घरी जशी निवांत झोप लागते तशी ग्लानी मात्र इथ येत नाही. सतत भिरभिरणाऱ्या नजरा कुणाच्या तरी शोधात असतात , लोकरीचं विणकाम करणारे हात झटापट चालत असले तरी मनाची विरहाची झुंज मात्र निवांत एकाकी लढत असते कुठल्याही शत्रा शिवाय…. 

बांगड्या जुन्या झाल्या लेका कासारीन येणार आहे आज चांगल्या डझनभर भरीन म्हणते डाळींबी रंगाच्या………. ,हल्ली होत नाही माझ्याने नाहीतर तुला छानसा रुमाल विणून दिला असता मी अगदी एका तासात …………. , आम्ही सकाळी योगा करतो ते पण डॉट ६ च्या ठोक्याला बाई खूप चंगल्या आहेत आमच्या ………. , .ती कोपऱ्यावरची रूम आहे ना ती आमची तुम्ही जेऊन घ्या आधी आणि मग या गप्पा मारू तेव्हडच मन मोकळं करता येईल ग … , चार महिने झाले काका जाऊन आता मी एकटीच आहे पण हि आहेत ना माझी माणसं यांनीच केलं हो माझं सगळं दुसरं माहेरच आहे हे माझं ( पदराचा कोपरा थोडा ओला झालाच आपसूक ) ,………… मी सरकारी नोकरीत क्लास वन ऑफिसर होतो. मुलं परदेशात असतात मी इथं रमलोय अगदी मजेत जगतोय ………, असे अनेक सवांद मनात गुंतून राहिलेत तेही कायमचे … 

वसंत आजोबा म्हणतात तस आपण लोकांची दुःख उगाळीत बसण्यापेक्षा आनंद वाढवयाला हवा . मातोश्रीच्या या भेटीत भावनिक झालरीच्या किनारीत आनंदाचा मोर काही वेळ नाचून गेलाच लक्ष्मी आजीची  शेरो शायरी , शहा आजोबांनी गंमती जमती सांगत पाजलेला ग्लास भर चहा , मंदा आजीने गायलेल थरथरत्या पण लयबद्ध स्वरातलं " हर किसीका नसीब "  हे गाणं …… पुन्हा या हा होणारा ह्रिदयपर्शि आग्रह आणि उद्या ऑफिसला जायचंय या वास्तविकतेने  पुन्हा भानावर आलेलो आम्ही सगळेजण. 

कदाचित इथं आलेलो आम्ही मातोश्री आश्रमच्या शेजारून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाह प्रमाणे आहोत ज्या घाटावर गोतावळा दिसेल तिथं थोडं संथ व्हावं आपल्या जाण्यातला गारवा त्यांनाही द्यावा आणि नियती प्रमाणे पुढे प्रवाहित होत राहावं कारण … 

आयुष्य तेच आहे 
अन हाच पेच आहे ............

- संतोष टाकळे 

जत्रा .......... !





हनुमान जयंती आली कि जत्रांची सुरवात होते याच दिवशी बऱ्याच जत्रा असतात . गावागावातला हा मोठा उत्सव  सारं गाव यात गुंतून जात गाव देवीच्या मंदिरा समोरची हि जत्रा तशी पारंपारिक अगदी पूर्वजांनी सुरु केलेली.  हि प्रथा आजही कोकणात - घाटावर आणि महाराष्ट्रात सुरु आहे . कोकणात जत्रेला शबिना - छबिना अशी जुनी नावं आहेत. कोकणात गावदेवीची काठी ( कळकाच्या उंच काठ्या सजवून तयार केलेलं उंच निशाण ) वाजत गाजत इतर गावतल्या देवांना भेटायला जाते.  यातही खूप साऱ्या दंत कथा आहेत त्यापैकी कोकणातल्या लाटवण गावातली जत्रा बगाड लावून साजरी होते.  बागाड्याचा माणूस जत्रेच्या दिवशी पहाटे जंगलात जातो तो दिवसभर कुणालाही दिसत नाही. त्याच्या सोबत बळी द्यायचा बकरा असतो. दिवसभर उपाशी पोटी या माणसाने जंगलात राहून देवाच्या या बोकडाची सेवा करायची आणि मग तिन्ही सांजेला गावकरी बाजा घेवून या बगाड्याच्या माणसाला न्यायला येतात आणि मग जंगलातून मिरवणूक निघते बळीच्या बोकडाला आणि बगाड्याच्या माणसाला हार टिळा लावून गावाच्या वेशीवरून देवळात आणलं जातं त्याची यथासांग पूजा केली जाते. आणि मग मानकरी देवाला कोल लावतो आणि मानाचा बकरा कापला जातो ( सध्या बकरा देवाच्या नावाने सोडला जातो ) लोक या बगाड्याच्या माणसाच्या पाया पडतात आणि हा मग बागाड्यावर मध्य रात्री पर्यंत तो लटकत असतो. 

इकडे खेळण्याची दुकानं खचाखच भरलेली , बटाटे वडे , कांदा भजी , जलेबी , खाजा आणि तत्सम अनेक पदार्थांचे रुचकर वास त्या त्या दुकानाकडे गिराईकांना ओढत असतात, तंबूत सिनेमा बघायला लोक लायनीत उभे असतात , कुणी मिठाईच्या दुकानात फुकटात मिठाया चाखत भावात घास घीस करताना दिसतो. तर नुकताच लग्न झालेलं एखादं नवीन जोडपं लपून छपुन ice cream एकमेकांना भरवताना  त्या नव्या नवरीचा चेहरा लाजून काय फुललेला असतो .म्हातारी जाणती पारावर बसून गावाच्या नळा पासून ते थेट कोयनेच्या धरणा पर्यंत सगळ्या विषयांवर आपली भूमिका मांडत असतात. विडीचा एक झुरका मारून यांचा उत्साह अधिकच वाढत जातो .इतक्यात कुणी तरी मानकऱ्याच्या बायकोच्या अंगात आल्याची खबर घेवून येतो. लोक आहे त्या जागेवर टाचा वर करून देवळाच्या कठड्यावर घुमणाऱ्या मानकरणीला पाहतात चक्क गाव देवी तिच्या अंगात आलेली पाहून बाय बापडे तिच्या समोर हात जोडतात आई सांभाळ या लेकराला म्हणून इथूनच नमस्कार करतात काही लोक थेट कठड्याच्या जवळ जावून डोकं टेकवून आशीर्वाद घेतात गुरव वाजंत्र्यांना इशारा करतो घुमावा घुमावा आता मी आरती घेतो म्हणत खुद देवीच्या आरतीच्या ताटात धूप कापूर पेटवतो आणि  वाजंत्री त्यांचा स्लो ठेका बदलतात आणि जरा धावता ठेका धरतात मानकरिन जोरात घुमते गुरव तिची आरती करतो देवळातल्या कश्याच्या तांब्यातल पाणी मारून देवीला शांत केलं जात. आणि मनाची ओटी घेवून मानकरिन खाली उतरते.गाव देवाच्या जत्रेतला हा जागर असाच चालू असतो सकाळ उजेडे पर्यंत ………. 


 जत्रा आली कि ते  दिवस आठवतात लहानपणी आम्ही जत्रेसाठी पैशांची जमवाजमव करत असू कधी पार लांब रानात जावून काजूच्या बिया गोळा करायच्या आणि त्या विकायच्या किवा मग घरी न कळता कुठे तरी गुपचूप मजुरी करून पैसे कमवायचे सारं काही या जत्रेसाठी तेंव्हा बाबा १० रुपये द्यायचे आणि आम्ही जमवलेले २० एक रुपये या वीस तीस रुपयात जमतील तेवढी खेळणी घ्यायची गरगरणारा भोवरा ,पी पी करणारी पिपारी ,जादूचा आरसा ,पाण्याचा फुगा ,तलवारी ,बंदुका इत्यादी .मग बाबा देवाच्या पाया पडायला नेत असत त्या तोबा गर्दीतून बाबा माझा हात घट्ट पकडून ठेवत त्यांची ती काळजी आजहि तशीच आहे मागे मी पहिल्यांदा विमान प्रवास केला तेंव्हा तर त्यांनी एका दिवसात मला तब्बल १० ते १२ वेळा फोन केला. 

जत्रा खरी रंगात येते ती मानाची काटी (एक लांब लचक काटी जिला सजवले जाते आणि तिच्या वरच्या टोकावर देवाचा झेंडा लावला जातो ) आल्यावर जोरजोरात ढोल बडवले जातात.  लोक काटीला उभी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात तर यात्रेत पोर पोरींना बघून मुद्दामून पिपाणीचा आवाज करत चार शिव्या खावून घेतात .आम्ही मात्र खेळण्याच्या दुकानासमोर घुटमळत काय नवीन मिळतंय का ? आणि उरलेल्या पैशात ते भागेल का ? याच्या विचारात पार टोकाच्या दुकानापर्यंत पोहचत असू , मग कुणी ओळखिचा भेटला कि आम्हा पोरांना तो सरबत पाजत असे कुणी वडापाव देई तस विकत घेवून खायची कधी वेळ आली नाहि कुणी काका - मामा  देणारा मिळेच. 

मी मागच्या वर्षी जत्रेला गेलो होतो. परत एकदा ते दिवस आठवले त्या दिवसात २० रुपये कमवायला दिवसभर लोकाकडे राबायला लागे , वेड्यासारखे ४ बिया जमवायला कट्या कुट्यातून आम्ही रानभर फिरायचो .आज हजाराच्या नोटा पाकिटात आहेत.  पण ते दिवस नाहीत माझ्या सोबत माझा भाचा ओमकार  होता त्याला घेवून मी जेंव्हा खेळण्याच्या दुकानावर गेलो तेंव्हा त्याचा तो जोश ,आनंद ,खेळणं मिळवायची धडपड ,आणि चेहऱ्यावर उमटलेले ते भाव मला त्या दिवसांचा आनंद परत  देवून गेले.  पण कधी कधी वाटतं सगळं काही विसरून मस्त लहान व्हावं खूप खेळावं अगदी गावभर भटकून यावं त्या जुन्या मित्रांमध्ये पुन्हा रामाव लगोरी ,विटी दांडू ,डोंगर का पाणी, गोट्यांचा डाव मांडावा खेळता खेळता दिवस मालवावा आईची हाक यावी तीन्हीसाजी शुभंकरोती म्हणावी रडत खडत एकदा धडा वाचत वहीत अभ्यास लिहून काढावा आईच्या हातची चुलीवरची गरमा गरम भाकरी रस्सा भाजी तोंड लावणीला सोबत मिर्चीचा ठेचा आणि रात्री रंगीबेरंगी सुती गोधडीच्या उबेत आईच्या कुशीत बिंदास झोपून जावं कदाचित ते दिवस परत मिळवता आले असते. पण ते तितकंसं सोप्पं नाही आपण मुंबईच्या या मायावी जत्रेत स्वतः हून असे हरवलोय कि आपल्या घरचा खरा पत्ता मिळूनही आपली पावलं त्या रस्त्याकडे वळत नाहीत मनात कितीही ओढ असली तरी ………………………

- संतोष टाकळे 

लग्नाची सनई ............!





मागच्या आठवड्यात घरी जावून आलो १ दिवसाची धावती भेट होती. सगळेजण एकत्र असताना वेळ फार लवकर जातो राव.गोड तिखट जेवणा सोबत अनेक विषय निघाले आणि अपेक्षेप्रमाणे माझ्या लग्नाचा विषय आलाच . बजेट, ठिकाण, पत्रिका, पाहुणे आणि सर्वात खर्चिक असणारा बस्ताचा विषय निघाला ( लग्नाचे आणि मानपानाचे कपडे ) इतक्यात अपर्णा (माझी ४ नंबर ची बहिण) म्हणाली तुझ्या लग्नात मी पैठणी घेणार ते आदेश भावोजी देतात ना त्यातली. बाप रे १ साडी ७ ते ८ हजारांची एकूण ५ बहिणी म्हणजे आठ पंचे चाळीस क्याल्कुलेटरने हि मोठी फिगर काही सेकंदात दाखवली त्याला काय फिगरी दाखवायला पण आमचं बजेट बिघडणार होत मला काही वेळ अपर्णा पैठणी नेसून मांडवात फिरताना दिसली पैठणीचा पदर हवेत उडवत ती आलेल्या पाहुण्यांशी बोलत होती .अहो संतोषने घेतली पैठणी त्याच्या लग्नात ८ हजाराची आहे हो मी म्हटलं कशाला एवढी महाग मला आपली साधी साडी सुद्धा चालेल पण तो एकतोय त्याने घेतलीच आणि तशीही मला घ्याचीच होती. हि फक्त लग्नात नेसायला घेतलीय रिसेप्शनला अजून एक घेतलेय चटणी कलरची ती सुद्धा मस्त आहे कांजीवरम स्लिक तो दुकानदार तिचे ४ हजार घेवून बसला होता मी म्हटलं साडेतीनला देतोस तर दे आता एवढी खरेदी केल्यावर काही डिस्कावुंड नको का ? काहीवेळ मंद शांतता तेवढ्यात बाबा म्हणाले हरकत नाही तुझ्या लग्नासाठी ११ लाख ठेवलेत त्यात हे ४० हजार म्यानेज होतील मी जरा उडालोच ११ लाख बाबा उगाच मस्करी करू नका त्यावर त्यांनी पोस्टाच्या किसान बचत पत्राच्या ३ पावत्या समोर ठेवल्या ५-५ लाखाच्या दोन आणि १ लाखाची १, काही वेळा पूर्वी फक्त २ ते ३ लाखात लग्न उरकूया म्हणणारा मी आता हॉल मधून थेट लॉन मध्ये पोहचलो होतो एव्हाना मनात लग्नाचा ग्रांड सेट तयार झाला होता .LCD ,ऑर्किड आणि अशा तत्सम परदेशी फुलांनी सजवलेला स्टेज ,मुंबईच्या मित्रांसाठी राहायला दापोलीतल महागडं हॉटेल ,मराठी जेवणा सोबत जरा इटालियानो ,थाई ,निदान चायनीज तरी हवं असे अनेक महागडे चोचले २०० च्या स्पीडने मनात येवून गेले
.

पैशाच्या हिशोबात लग्नाची सनई अधिक जोरात वाजू लागली आणि हळदी शिवाय चेहरा अधिकच खुलला मनात अनेक हळुवार कारंजी वरखाली उडू लागली आईने जवळ घेतलं पोरगा मोठा झाला म्हणत पाठीवरून हात फिरवला बाबांनी लगेच गावात बोलणी करायला हवी म्हणून सरपंचाना फोन लावला सगळं कस गजबजून गेल. भाच्या भाच्यांनी मामाची मामी कशी आहे रे गोरी कि काळी म्हणत अंगणात गोगाटा केला तर मित्रांनी साल्या आज बसुया रात्री म्हणत हक्काची पार्टी लागू केली. आई अजूनही शांत निवांत मागच्या दारात बसून एक टक पुढच्या दाराकडे पाहत होती कदाचित तिला तिचा गृहप्रवेश आठवत असेल अवघडल्या मनाचा कल्लोळ ,भरजरीचा पदर , तोळ्याच्या हिशोबातले दागिने ,लाजत घेतलेला उखाणा ,आणि नकळत झालेलेला त्यांचा स्पर्श अगदी जसाच्या तसं कदाचित ती अनुभवत असेल तिच्या ओल्याशार भिजलेल्या पापण्यान मधून सुनेच्या रुपात .................




- संतोष टाकळे


फोटो प्रातिनिधिक स्वरुपात असल्याचं लक्षात असूद्यात ...

आम्ही कॉपीकर ......!



मराठीत येणाऱ्या नव्या मालिका हिंदीमधून कॉपी केल्याचं स्वतः प्रेक्षक बोलतात पण दिग्दर्शक मात्र याला ठाम विरोध करतात मराठीत सध्या सर्वात जास्त TRP खेचणारी पुढचं पाऊल स्टार प्लसच्या साथ निभाना साथियाची कॉपी आहे हे शेंबड पोर सांगेल. नुकतीच सुरु झालेली देवयानी सुद्धा प्रतीग्याची कॉपी आहे हे स्पष्ट आहे. याची यादी द्यायची झाली तर
एका लग्नाची दुसरी गोष्ट - बडे अच्चे लगते है I
लक्ष - CID 
सुवासिनी - बालिका वधू
अनोळखी दिशा - आहट आणि अशा कित्तेक हिंदी मालिका
अजून बरीच उदाहरणं देता येतील आपल्याकडे कॉपी करणं सरास झालं आहे .पण एक मात्र खरं आपल्या मराठी कलाकाराचा अभिनय मात्र तोडीस तोड आहे पुढचं पाऊल मधली हर्षदा खानविलकरांची अक्का बेस्ट , तर देवयानी मधाला संग्राम तोडून टाकतो म्हणजे कोल्हापुरी भाषेत सागायच तर छावा तलवारीगात भिंडतो.

पण खरच हे कॉपी करणं थांबवलं पाहिजे. काही तरी नवीन होत नाही अस मी म्हणणार नाही कारण मराठी अजय अतुलच्या गाण्यावर आम्ही कतरिनाला नाचावालय, जोगवा ,नटरंग ,देऊळ श्वास सारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेत. आपल्या मराठीपणाचा बाज कायब राहिला पाहिजे पुढचं पाऊल कॉपी आहे म्हणून गाजावाजा झाला .आणि पुन्हा आपल्या कार्यक्षमतेवर कुणीतरी बोट ठेवलय पण मला खात्री आहे. लवकरच हे चित्र बदलेल.

- संतोष टाकळे
Sanntosh Taakale


मास्तरकी........ !




मागच्या आठवड्यात रोह्यावरून कुलकर्णी सरांचा फोन आला. त्यांच्या मास मिडिया विभागात गेस्ट लेक्चरर म्हणून जायच होत .मी लगेच हो म्हटलं गेल्या काही वर्षात मुंबईतल्या अनेक कॉलेजात मी गेस्ट लेक्चरर म्हणून जावून आलोय पण ग्रामीण विभागातला हा पहिलाच अनुभव कॉलेज कस
असेल मुलांच्या नेमक्या काय अपेक्षा असतील असे अनेक प्रश्न साहजिकच आलेच पण तशी तयारी करूनच मुंबईतून एस टी पकडली रस्ता तसा ओळखीचा होता कारण हाच रस्ता माझ्या गावी जातो. मुंबई सोडली आणि मनावरचा थोडा शीण हलका झाला काही वेळ आपण मोकळा श्वास घेतोय याची जाणीव झाली.

महामंडळाची बस तशी वेगात चालू होती पण मलाच निघायला उशीर झालेला म्हणून साला गाडी पळततच नाही अशी चिडचिड चालू होती शेवटी काय होयील ते बघू म्हणत भीमराव पांचालांची गजल ऐकायला लागलो मी किनारे सरकताना पहिले माझी सर्वात आवडती गजल लागोपाट ४ वेळा ऐकली आणि इतक्यात गोरे सरांचा फोन आला. गोरे सर भाषा आणि अभिभाषा हा विषय शिकवतात आज त्यांच्याच घरी माझी रहायची व्यवस्था होती घड्याळ पाहिलं तर १० वाजलेले अजून किमान १ तास लागेल आणि त्यापुढे अजून १ तासाचा रस्ता बाप रे म्हणजे १२ वाजणार इतक्या उशिरा कोणाच्या घरी जाणं बर दिसत नाही मी गोरे सरांना मेसेज केला एवढ्या रात्री तुमच्या घरी कसं जावं इथे कूठे हॉटेल असेल तर तशी व्यवस्था कराल तर बर होयील पण गोरे सर ऐकायला तयार नव्हते शेवटी माझ्या पुढे पर्याय नव्हता ११ वाजता इंदापूरला उतरलो सर गाडी घेवून आले होते मी त्यांना सॉरी म्हणार इतक्यात तेच म्हणाले सर काही प्रोब्लेम नाही अहो मुंबईला तुम्ही सगळेच इतके गुंतलेले असता तरीही तुम्ही येतो म्हणालात आमचं अहोभाग्य मी आपला उगाच जरा हवेत उडून घेतलं आहे बाबा आपली किमंत म्हणत उगाच मानेला हलकासा झटका देत केस उडवले. थोडं फ्रेश होत पुन्हा तळा ३५ किलोमीटर दाखवणारा मायील स्टोन पार करत एक तासाचा प्रवास सुरु झाला. रस्ता जबरी होता अगदी नवा कोरा नुकताच घोटाळ्यात अडकलेल्या आणि साहित्याची विशेष आवड असणाऱ्या करे काकाचं हे गाव काही वेळ काकांनी पैसा जनहितार्थ वापरला कि काय अशी शंका आली पण मग कळलं हा रस्ता मुरुड जंजिरा दिशेने जातो आणि सध्या तिकडे एक नवीन पोर्ट तयार होतय त्याची हि सगळी जादू बाकी करे काका इतके काही वाईट नाहीत हो - इति गोरे सर

तुफान थंडीत गोरे सर ४० च्या स्पीड ने गाडी चालत होते एकवेळ माझ्या मनात आल गाडी आपण घेवून स्पीड वाढवूया पण सर पाहुण्यांना बोलता याव जास्त थंडी लागू नये अशी काहीशी काळजी करत गाडी चालवत असावे. घुर घुर करत अखेर सरांच्या घरी पोहचलो एवड्या रात्री गावात लोकांची मध्यान झालेले असते गोरे सरांच्या घरीही सगळे झोपले होते अर्थात पाहुण्यांना यायची देखील वेळ असावी मी स्वतःलाच दोन शिव्या घालत हसडल आणि घरी शिरलो सरांचे बाबा अण्णा लगबगीने उठले तांब्याभर पाणी देत कसा झाला प्रवास वेगरे विचारपूस केली एवढ्यात सरांची आई पुन्हा चूल पेटवून जेवण गरम करताना दिसली त्यांना झोपेतून उठवून इतक्या कडाक्याच्या थंडीत धावपळ करताना पाहून मला इतकं वाईट वाटल खरच ते शब्दात सांगता येणार नाही. तू एवढा कोण लागून गेलास तुझ्या वागण्याला काय सुमार एवढ्या थंडीत या माऊलीला त्रास देतांना तुला जराही लाज वाटली नाही का रे असे अनेक खडे सवाल मी स्वतःलाच जरा दमात विचारले पण इलाज नव्हता दोन घास कसे बसे खाल्ले आणि सरळ लांब झालो. सकाळी लेक्चर होतं म्हणून आणि अर्थात लवकर उठाव लागणार होतं पडल्या पडल्या कधी डोळा लागला काही माहित नाही सकाळी चुलीवरच्या कोऱ्या चहाच्या वासाने डोळे किलबिलत उघडले तर सरांची आई चुलीवर भाकऱ्या करत होती एवढ्या सकाळी कोण खाणार भाकऱ्या असं विचारणार तर गोरे सर सोमर उभे सर उठा पाणी काढलंय अंघोळीला गरम गरम चहा आणि भाकरी सोबत झुणका केलाय आईन चहा आणि बेकरीतल्या पावावर सकाळ होणारे मुंबईकर सकाळी भाकरी खातील अस वाटत नाही बुवा अण्णा माझ्याकडे पाहत म्हणाले पण मी दाबून दो भाकऱ्या संपवल्या. आणि सरांसोबत थेट कॉलेजात .

साग्रसंगीत स्वागत वैगरे झालं गोरे सरांनी इतरांशी ओळखी करून दिल्या माझा परिचय झाला आणि लेक्चर सुरु झाल. काही वेळ बोलल्यावर माझ्या लक्षात आलं कि मुलाच्या चेहऱ्यावर थोडा संभ्रम आहे त्यांना नेमका कळतंय कि नाही हे तपासून पाहायला हव आणि मधेच थांबत मी मग थेट संवाद साधला एकेकाला बोलत केलं पण मला वाटली तितकी हि मुलं मागे नव्हती त्यांचे कित्तेक प्रश्न मला काहीवेळ विचार करायला लावणारे होते . पु ल पासून ते ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख पर्यंत आणि इरावती कर्वे यांच्या युगांत पासून ते बराक ओबामांच्या Change We Can Believe In पर्यंत सारं काही काळजी पूर्वक वाचलेलं कोणताही संधर्भ विचारा किमान ५ - ६ बोटं वर येतील माझ्या साठी अचाट होत हे पण माझ्या गेल्या ६ वर्षाच्या करीयरची कसोटी होती. मी पण माघार घेणार नाही अस ठरवलं आणि किमान १ तास दिलेला असतानाही आम्ही पावणे दोन तास गप्पा मारल्या मुळात मुलं खूप मोकळी झाली बोलती झाली. मी thank you so much म्हणून बसतोय इतक्यात मास मिडिया चे Vice President कुलकर्णी सर डायसवर आले त्यांनी फार कवतुक केलं काही क्षण गहिवरून आलं संघर्षाच्या त्या सगळ्या लढाया आठवल्या बाबांचा २वर्षाचा अबोला , बातमीसाठी उन्हातानात वडापाव चावत फिरताना कशाला नोको त्या भानगडीत पडलो म्हणत वैतागत केलेली पायपीट , फक्त २ हजाराचा सकाळ पापेरच्या बातम्यांचा चेक हातात आल्यावर एवड्यात कस भागवणार म्हणत झालेला स्वतःचाच तळतळाट , महागडा शर्ट नाही म्हणून चुकवलेल्या अनेक पार्ट्या , आणि वरखर्चाला पैसे मिळावेत म्हणून रात्री उशिरा पर्यंत बड्या लग्नात केलेलं वेटरच काम सगळा भूतकाळ सरसर डोळ्यासमोरून गेला आणि "कोशिश करने वाले कि कभी हार नही होती" या ओळी आपसूकच ओठांवर आल्या.

लेक्चर चागलं झालं याच समाधान होतंच लगेच परतीच्या प्रवासाला लागूया अस मनात आल पण सकाळी भाकरी खाताना गोरे सरांची आई म्हणाली लेका आलास तर दुपारी दोन घास खावून जा मटन बनवते सत्तरी पार केलेल्या त्या मावूलीचा शब्द मला मोडता आला नाही. गोरे सर देखील खूप आग्रह करत होते शेवटी दुपारी मटणाचा बेत उरकून पुन्हा मुंबईचा रस्ता धरला संध्याकाळ मोकळ्या हवेत अधिकच अंधारत होती डोळे पेंगत होते हवेतला गारवा मनात रेंगाळत होता. सोबत होती ती या निम्मिताने भेटलेल्या त्या सर्वच गोड आंबट आठवणींची आणि इतक्यात कुलकर्णी सरांचं आभार प्रदर्शनातल शेवटच वाक्य आठवलं आपण आधी बोलावलेल्या नामांकित पत्रकार पाहुण्यांनी आयत्या वेळी नकार दिला आणि या पाहुण्यांनी आयत्यावेळी होकार वयाने तसे लहान असले तरी सर तुमच भविष्य उज्ज्वल आहे. मी पुन्हा जरासं हसलो आणि मनाशी म्हटलं चला भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आधी स्वतःला घसघसून घासायला हवं कारण चकचकत्या वस्तूला आज भाव आहे सोन्याचा नव्हे तर चढ उताराच्या मार्केटचा ............

- संतोष टाकळे

माणुसकीचा धर्म ...............!



परवा पुण्यात जाताना सिंहगड पकडायची होती.ऑफिस मधून निघायला आधीच उशीर झालेला. CST ला पोहचलो तर तिकिटासाठी भली मोठी लाईन गाडी सुटायला अवघी १५ मिनिटे बाकी कदाचित गाडी सुटेल अशा बेतात मी होतो. पण एकदा कुणाला तरी मस्का लावून बघावा म्हणून एकाला गाठला सर एक तिकीट काढून देणार का ? मी बिचारा चेहरा करून त्याला विचारल ,कदाचित मी सर बोललो म्हणून तो खुश झाला असावा. त्याने लगेच व्हाय नॉट म्हणत त्याच्यासोबत माझीहि तिकीट काढली आणि आम्ही दोघ पळत सुटलो ते थेट डब्यात जावून थांबलो. किमान ३- ४ तासाचा प्रवास म्हणून मी नेमही सोबत वाचनासाठी पुस्तक , किव्हा मासिक ठेवतो .कलमनामाचा ( जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच हे विकली पाक्षिक) दिवाळी अंक होता हो काढून वाचायला सुरवात झाली. एव्हाना गाडीने ठाणे सोडलं होतं. खरतर अंक घेवून २ महिने झाले पण अजूनही बरच वाचायच बाकी होत.आज अनायसे वेळ मिळाला होता म्हटल पुण्यात पोहचेपर्यंत अंक निम्मा वाचून पूर्ण करायचा.राकेश शिर्के म्हणजे आमचे मास्तर यांना प्रतिक्रिया द्यायची अजून बाकी आहे. विद्या बाळ यांचा मिळून साऱ्याजणी हा स्वप्रवास लेख वाचत होतो. इतक्यात समोरून हाक आली.नमस्कार सर मी जरा चेहऱ्यावर वैचारिक भाव आणून कोण मी ?सोमोरून हो सर तुम्हीच मी मनात म्हणालो हो खरतर मी मास्तरच ह्वायचा चुकून या क्षेत्रात आलो.

मी - हं बोला.
समोरून - नातेसंबध म्हणजे काय हो ?
मी - आता याला काय सांगू मी हातातलं मासिक पालटल तर मेन पेज वर लिहिल होत कलमनामा नातेसंबंध
मी उत्तर दिल अहो या मासिकात जे लेख , कविता आणि कथा आहेत त्या या विषयावरच्या आहेत.

समोरून - अस वह्य !

मी - सुटलो बाबा म्हणत पुन्हा विद्या ताईचा लेख वाचायला घेतला.

समोरून - फार तुटक उत्तर देत राव तुम्ही.

मी - पील्ज मला वाचु द्या कि ?

समोरून - तुमच्या सोमर जिवंत माणस असताना पुस्तकातली निर्जीव माणसात तुम्हाला भारी रस दिसतो आहे.

मी - आता माझी सटकली मी म्हटल नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा.

समोरून - अहो प्रॉब्लेम असल्यावर आठवण यायला आम्ही काय मुंबई मध्ये राहत नाही .

आता मात्र हद्द झाली मी गप गुमान मासिक बाजूला ठेवल. काही वेळ गेला असेल त्याने पुन्हा मला डिवचल सर जरा तुमच पुस्तक देता का ? अहो हे magazine आहे पुस्तक नाही त्यावर तो म्हणाला तेच ते
मी निमूटपणे कलमनामा त्याचा हातात दिला आणि डोळे बंद केले. कदाचित तो अजून प्रश्न विचारण्याची दाट शक्यता होती. त्यावर १ तास गेला आणि पुन्हा हाक आली झोपला का हो सर मी मुद्दामून काही उत्तर दिल नाही. आणि एक झोप काढून घेतली जेव्हा मला जाग आली तेव्हा त्या माणसाने तब्बल अर्ध मासिक वाचून पूर्ण केलं होत. आणि तो याच मासिकातल्या डॉ.बाबा साहेबांच्या लेखावर त्याच्या मित्राशी बोलत होता. मराठा आणि ब्राम्हण समाजाच्या लोकांची मानसिकता ,अजूनही वेशी बाहेर असणारा समाज etc etc.

एक दोन वेळा तर त्याने खालच्या शब्दात त्याने मराठा आणि ब्राम्हण समाजावर टीका केली आणि मग मला काही राहवलं नाही मी स्वतः मराठा समाजाचा आहे. पण खरतर माझ्या दुष्टीने माणुसकीचा समाज सर्वात श्रेठ आहे .काही असल तरी प्रत्येकाला त्याच्या समाजाचा स्वाभिमान असतोच तो माझ्यातही आहे. मी त्याला तिथेच रोखल . सरसकट कोणावरही आपण टीका करू शकत नाही कारण समाजात जितकी वाईट माणस आहेत तितकीच चांगली देखील आहेतच कि . मुळात मी आरक्षणाच्या विरोधात आहे .पूर्वी मला या विशिष्ठ समाजाचा प्रचंड राग यायचा. त्याला कित्तेक कारणे आहेत ती अशी उघडपणे इथे लिहिता येणार नाहीत.पण जेव्हा मी भोतमांगे या दलित कुटुंबाच अमानुष खेर्लांजी प्रकरण पहिल त्या दिवसापासून माझा दृष्टीकोन बदलला आणि मी माणुसकीचा धर्म स्वीकारला .काही दिवसांपूर्वी मला मराठा समाजाकडून एक समारंभासाठी बोलावणं आल होत .पण त्यांची अट मला मान्य करता आली नाही. ती अट होती तुम्ही फक्त मराठा समाजाबद्दल बोला मी साफ नकार दिला. मला अभिमान आहे मी मराठा असल्याचा पण म्हणून मी फक्त माझ्या समाजाबद्दल बोलणं मला पटणार नाही. आज समाज ,जाती, धर्म यांच जे नागडं तांडव नृत्य चाललंय त्यावर बोलू का ? माझा प्रश्न कदाचित त्यांच्या पचनी पडला नसावा . आणि ते आयोजक आल्या मार्गी परत गेले.

कलमनामामुळे खरतर त्या समोरच्या व्यक्ती सोबत संवाद सुरु झाला आणि हळूहळू आमच्यात सुसंवादाला सुरुवात झाली . काही तासांपूर्वी ज्याच्याशी बोलताना मी जो तुसडेपणा दाखवला तोच मेघराज आव्हाड त्याच्या गावातल्या व्यसनमुक्तीच्या चळवळीचा प्रणेता आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास समितीचा अध्यक्ष आहे .आता तर मला तो नुसता बोलत रहावा असा वाटत होत. कारण त्याच्या बोलण्यात तो ग्रामीण महाराष्ट्र होता जो आमच्या मंत्रालयातल्या सरकारी अधिकाऱ्यानी आणि नेत्यांनी कधीच पाहिला नसेल.

काही वेळातच पुण्यात पोहोचणार होतो. मी त्याला कलमनामा भेट म्हणून दिला. अंक मस्तकाला लावत तो म्हणाला साहेब आज महाराष्ट्राला या विचारवंताची गरज आहे. मी हसलो आणि म्हणालो अहो म्हणून तर नातेसंबंध जपावी लागतात कारण मग धर्म , जात आणि समाज कोणताहि असो जिव्हाळा असला कि माणस आपली होतात..........

--- संतोष टाकळे

माहेर नसतं फार दूर ............!



आयुष्यात बहिणीच महत्व काय ?या प्रश्नाच उत्तर नेमक कस द्याव माहित नाही पण मला ज्या बहिणीच प्रेम मिळाल ते अवर्णनीय आहे . मला आळू वडी आवडते म्हणून खास माझ्यासाठी अळूवडी करणारी कल्पना ,मी आजारी असताना रात्रभर उशाला बसून हनुमान चालीसा वाचणारी नंदा ताई ,माझ्या खिशात फक्त १०० रुपये पाहून ५०० ची नोट गुपचूप माझ्या पाकिटात ठेवणारी अर्चू ताई, मला कुणी काही बोललं तर पदर खोचून किमान तास भर भांडणारी अपर्णा आणि मंदा माई,आणि संतोष दादा साठी स्पेशल दुधाची चहा बनवणारी माझी पारू नाती आपण गुंफू तशी ती वळतात नात्यांचा गुंता होऊ नये म्हणून काय कसरत करावी लागते ते तुम्हा सर्वाना माहित आहेच परवाच पारूच लग्न झाल.बिदाई होताना खूप रडली तिला जाताना पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या पण मनात एक आनंद होता. तिच्या नव्या आयुष्याच्या सुरवातीचा ......
पण एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरिच आहे. ज्या घरात या मुलीनी जन्म घेतला. इथ त्यांना आई , बाबा , भाऊ ,बहिण , मावशी आत्या अशी कित्तेक नाती मिळतात त्या त्यांच्या हक्काच्या घरातून परक्या घरात जाताना त्यांच्या मनाची अवस्था नेमकी कशी असेल ????

--- संतोष

निखळ मैत्री ................!




हल्ली मैत्री फेसबुकच्या वॉल आणि फ्रेंडलिस्ट मध्ये अडकली आहे.पण अजूनही ती निखळ मैत्री कायम आहे. आज सकाळी माझी बालमैत्रीण शिल्पा मला मी ऑफिसात येत असताना भेटली खरतर नेहमी प्रमाणे मी इतक्या गडबडीत होतो कि ती समोरून गेली तरी मी तिला ओळखल नाही. कदाचित तिने मला पाहिलं असाव आणि तिनं जोरत हाक मारली ये संतोष माझ्यासोबत निदान अजून १०-१२ लोकांनी वळून पहिल असेल .मी जरा वैतागून मागे पहिल भर रस्त्यात हि बया कोण ? मला इतक्या असभ्यपणे हाक मारणारी मी म्हटल कोण आपण इतक्या वर्षांनी तिला ओळखणं कठीण होत. दोन वर्षांपूर्वी तिच लग्न झालेल कुणाकडून तरी ऐकलं होत. तिच्या सोबत तिचा लहान मुलगा आरुष होता.तिने चटकन त्याला सागितलं हा तुझा मामा आई ग आता काय बोलू मी काही सुचत नव्हत. शिल्पा तशी फार हुशार मला तिची हुशारी नेहमी कामी यायची जेव्हा मी गणितात कच्चा होतो ती नेमही माझी गणित सोडवून द्याची आज ती जेव्हा भेटली तेव्हा खूप साऱ्या आठवणी जागा झाल्या सोबत तिचा नवरा होता. हे ती कदाचित विसरली असावी कारण एव्हाना तिने जवळ जवळ शाळेतल्या डब्या पासून ते सहली पर्यंत धडाधड सगळा FLASH BACK समोर आणला होता . बाजूने जाणारे लोक कुतूहलपूर्वक बघून जात होते म्हणून मग आम्ही समोरच्या एका वातानुकुलीत रेस्तारो मध्ये गेलो. थोडा वेळ झाला असेल आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो मी नाही का बोलली होती. तुम्हाला माझा वर्गमित्र संतोष इथल्या एका  कंपनी मध्ये काम करतो. फार हुशार हो हा नेमही चांगल्या मार्काने नंबर काढायचा (मी मनातल्या मनात साफ खोट बोलतेय हि माझा एकदाच शाळेत २ नंबर आला .आणि मग कधी मी नंबरात बसलोच नाही.) नुकताच त्याने महागडी गाडी घेतली आहे शिवाय घर पण आहे मुंबई मध्ये. बहुतेक सगळ्या सेलेब्रीटी सोबत याचे खूप चांगले समंध आहेत .etc etc तो बिचारा माझ्याकडे इतक्या आशर्यकारकरित्या पाहत होता .आत्ता मात्र मला राहवलं नाही.

मी तिला थांबवल एकतर मी अजून गाडी घेतली नाही. घर घेतल आहे पण त्याचा ताबा मिळणं अजून बाकी आहे. मला मधेच थांबवत ती म्हणाली पण मी तर फेसबुक वर तुझे गाडी सोबत कित्तेक फोटो पाहिलेत आणि तेव्हा चटकन क्लिक झाल अरे यार आपल्या सोशल नेटवर्किंगवरच्या प्रत्येक अपडेटचा किती परिणाम होतो. पालघरच्या त्या तरुणींनी याचा अनुभव घेतला आहे. आणि आज तसाच काहीसा मलाही तो अनुभव आला.

हि पोस्ट टाकण्यामागे एकच कारण दिखावा आणि परिथिती यात तफावत असते तिला दुर्लक्षित करून चालणार नाही

आकर्षण काही काळ टिकत पण खरेपणा कायम तुमच्या सोबत असतो

---- संतोष टाकळे

ते दिवस राहले नाहीत............





अगर इतनी हो बेरुखी हमसे तो प्यार ना करो ..............! आज सकाळी चर्चगेट स्टेशनच्या बाहेर पडता पडता कानावर या ओळी पडल्या मी मागे वळून पहिल तर एक वीस बावीस वर्षाचा तरुण हे गाण मोबाईलवर कुणाला तरी ऐकवत होता. नेहमी प्रमाणे मी flashback मध्ये गेलो आणि कोलेज चे दिवस आठवले आम्ही तेव्हा मुलींसोबत इतक्या सहजपणे बोलत नसू फार दबक्या आवाजात मुलीन बद्दल आमच gossip चाले त्या पैकी

ती किती मस्त दिसते ना ?,
यार सहीच आहे एकदम टकटक
ती नुसती बघून हसली तरी दिवस काय जातो यार
अरे माझी वाली आली काय ?
ती आज मला तिच्या बापा सोबत दिसली ती कोणाकडे क्लासला जाते रे ?
च्यायला त्या विकासची मानलेली बहिण आहे ती यार
काय पण बोल पोरगी बेस्ट आहे एकदम सुता सारखी सरळ
अरे आज तुझ्या .... ने काय भारी ड्रेस घातलय रे एकदम हिरोयीन वाटतेय etc etc .
(काही शब्द जसेच्या तसेच लिहिले आहेत कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नाही)

तेव्हा आपल्याला कुणी तरी कुणाच्या तरी नावाने चिडवणं किती रोमांचक वाटायचं हे आता शब्दात व्यक्त करता येत नाही. कारण मी ते स्वतः अनुभवलय ते दिवसच फार वेगळे असतात तिच्या साठी उगाचच रेंगाळत चालणं , वर्गात नजर चुकवून तिच्याकडं पाहणं,तिच्या मैत्रिणीकडे मस्का लावत आपला निरोप पाठवणं आणि अर्थात सर्वात महत्वाच म्हणजे जेव्हा ती आपला निरोप मिळताच थोड लाजत , खाली मान घालून दबक्या पावलाने जवळ येत हु बोल काय काम आहे अस म्हणत समोर आली कि छातीत धपकी भरल्यागत घुटमळत काही नाही ग तुझ्या ईकोच्या नोट्स देशील का ?म्हणत वेळ मारून न्यायाचा तो क्षण अक्षरश मोरपिसागत हलका असतो. आणि ती वळली कि जरा आवाज सुटल्यागत ऐक ना तू मला आवडतेस , ती पुन्हा गरकन फिरून काय ? परत बोल काही नाही काही नाही म्हणत तिथून पळ काढताना मनात कित्तेक कारंजे वरखाली उडत असतात एकदाचं बोललो तिला याचा आनंद तर दुसरीकडे तिने घरात सागितलं तर काय होयील याची भीती पण कदाचित तिलाहि मी आवडतो याची उगाच खात्री बाळगत पुन्हा गालातल्या गालात आनंदाची एक नवी लाट येवून बायिकला किक मारून सरळ मोकळ्या रस्त्याने हवेसोबत गाणी गात तिचा तो लाजरा चेहरा पुन्हा पुन्हा आठवत त्या धुंदीत घराकडे येण अवर्णनीय .....

आता ते दिवस राहले नाहीत मात्र त्या आठवणी अजूनही तशाच हळुवार गुंगावून जातात खूप दिवसांनी जुनी रेड वाईन घेतल्यागत ........


--- संतोष टाकळे

पांघरुणातली थंडी ......!



मुंबईत थंडी पांघरुणात शिरली कि जाणवतं आयला हिवाळा सुरु झाला वाटतं आज सकाळी अंथरुणातून उठायची इच्छा होत नव्हती. सुखवस्तू या जगण्यात किती आळस अंगात भरलाय नाही तर गावात असताना सकाळी ६ ला उठून कामं सुरु ,तेंव्हा आम्ही मळा करायचो त्यावेळी भर थंडीत आई, बाबा, मी आणि माझ्या बहिणी सगळे शेतात अगदी अंधारोस्तवर काम करायचो त्या थंडगार पाण्यात काम करताना कधी त्रास झाला नाहि कारण पोटासाठी थंडी काय आणि पाऊस काय?

खऱ्या थंडीचा सामना सकाळी अगदी पहाटे आई आणि मी भाजी विकायला जायचो तेंव्हा ह्वायचा आई मोठा हारा ( मोठ्ठ टोपलं) घ्यायची त्यात मुळा, माठ ,कोतीम्बीर,पालक ,मेथी अशा भाज्यांच्या दोन एक शे जुड्या असायच्या आणि माझ्या टोपल्यात वांगी , टोमाटो,घेवडी ,कारली अशी भाजी सकाळी त्या घुक्यात आम्ही भाजी घ्या भाजी म्हणत चार पाच किलोमीटर पायपिट करायचो सकाळी मोकाट कुत्री अंगावर यायची म्हणून एक मजबूत काठी माझ्या हातात असायची आई कधी कधी खुप दमायची मग मी तिच्या डोक्यावरच टोपल खाली उतरवायचो थोडा दम खावून परत पायपिट सुरु कधी कधी मला खुप कंटाळा यायचा मग आई म्हणायची बाबू थोडा वेळ दम धर अजून दहा बारा जुड्या उरल्यात घरी नेल्या तर सुकून जातील घरी जाताना आपण ५ रुपयाचे गुलाबजाम घेवू नाहींतर तुला हवं ते घे तिचा थंडगार थरथरता हात गालावरून फिरला कि काय उर्जा यायची माहित नाहि मी अजून जोरानं ओरडायचो भाजी घ्या भाजी गावठी भाजी.

आज खूप दिवसांनी अंथरुणात पडल्या पडल्या हि आठवण ताजी झाली लगेच आईला फोन केला म्हटल आई आठवतंय आपण याच दिवसात दोघे भाजी विकायला जायचो ती म्हणाली हो रे तूझी अजूनही बऱ्याचजणी आठवण काढतात आणि म्हणतात वाहिनी तुमच्या सोबत भाजी विकायला यायचा तो मुलगा आता काय करतो ? मी विचारल मग काय सांगतेस तू त्यावर तिच उत्तर होत मुंबईत असतो पेपरात लिहतो स्वतःची शेती असताना चाकरी करतो.मी म्हटल आई तू म्हणालीस तर आत्ता गावी परत येतो .पण या मायापुरीतून निघण म्हणजे चक्रव्हू तोडून येण्यासारखा आहे. त्यावर ती म्हणाली येतोस का ?बोल परत जावू भाजी विकायला मी म्हटल चालेल प यावेळी मी मोठ्ठ टोपलं घेयीन आणि तू छोटं टोपल घे

सकाळी सकाळी अशा गोड आठवणीत बोचरी थंडी अधिकच रोचक झाली. हातात ब्रश घेतला आणि पुन्हा नव्या दिवसाच्या धकाधकीला सुरवात ............

- संतोष टाकळे

साहित्य संमेलनाची गोची .........!



आमच्या कोकणात साहित्य संमेलन होणार अशी ब्रेकिंग न्युज एका प्रसन्न संध्याकाळी पहिली आणि आनंदाला उधान आल्यागत एक कथा पूर्ण केली. तसा मी काही साहित्यिक नाही कारण माझी कोणत्याही बड्या राजकीय नेत्यासोबत मैत्री नाही. तुम्हाला लिहता आल नाही तरी चालेल पण जर तुमची बडी ओळख असेल तर झालच कि मग तुम्ही अगदी बडबड गीत लिहिली असलीत (ती हि ट ला प जोडत ) तरीही तुम्ही साहित्यिक म्हणून मिरवू शकता त्यात विशेष अस काही नाही हो मस्त एक खादी लेलन किवा तत्सम सदरा विकत घ्या , सोबत शबनम झोळी आणि वैचारिक मुद्रा बस झालात किहो तुम्ही टिपिकल साहित्यिक असो प्रश्न आहे तो साहित्य संमेलनाच्या गोचीचा अगदी जेव्हा या संमेलनाच सूप वाजल त्या क्षणापासून जो काही वाद सुरु झालय तो आजतागायत कदाचित आमच्या कोकणाची हवा यांना लागली असावी तशी आम्ही कोकणी माणस फटकळ किव्हा जराशी भांडखोर असलो तरी मनाने मात्र निर्मळ अगदी नारळातल्या पाण्यासारखी...

आमच्या खास कोकणी भाषेतली हि गम्मत ...

साहित्य संमेलनाचा आमच्या कोकणी माणसाला काय आनंद झाला हो परवा परबांचा मन्या भेटला होता दादरला म्हणाला जावूयाना मी म्हटल कुठे तर तो म्हणाला संमेलनाला एड्या तिकडं वंदना गुप्ते , विक्रम गोखले , सुबोध भावे जमलच तर अलका कुबल यांना बघायला मिलेल मी म्हटल मेलास मन्या जलास तो हा काय नाट्य संमेलन नाय हाय अरे एड ..... ( शब्द सेन्सोर मध्ये बसत नाही ) साहित्य संमेलन हाय अरे या संमेलनाला बरीच लेखक ,विचारवंत आणि साहित्यिक मंडली येणार आहेत. तू पण वलकतोंस त्यांना थोर विचारवंत सन्माननिय तटकरे काका, जाधव मामा , अजित दादास,राणे भावोजी ,आपले दिल्लीकर जावई चव्हाण राव,गोव्याचे कामत आजोबा यांनी तर हे संमेलन भरवलानी हाय , तू वाचतोस काय रे पुस्तका मी आपल सहज विचारल तर तो म्हणाला वाचतो रे पण तुझ्यासारखी नाय मला बा जी कामाची वाटतात तीच वाचता म्हणजे कोणती रे त्यावर तो चिडला आणि म्हणाला हा बघ मला भेटायला येशील न तेव्हा तुझी पत्रकारीतीची झेंगटा ( भानगडी) लांब ठेव समजला नाहीतर माझ्यासारखा एड ..... माणूस दुसरा नाय अरे पण पुस्तकाचं नाव सांगतोस ना माझा आगाव पणा पुन्हा सुरूच हा ती बग आपली घरचा वैद्य ,चाणक्य नीती , भाताचे १०१ प्रकार , ५० दिवसात वजन कमी, विरहाची रात्र , माळावरचा बंगला अजून हि लिस्ट वाढायच्या आता मी त्याला थांबवला लय भारी पुस्तका वाचतोस रे , त्यावर त्याला फारच कवतुक वाटल म्हणाला ५० दिवसात वजन कमी करा हे पुस्तकं वाच साल्या जरा बारीक होशील मी माझ्या पोटाकडे बघत ऐइकुन न ऐकल्या सारखं केल.


संमेलनाची अशी गोची का?

साहित्य संमेलनाची अशी गोची का? व्हावी हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे .ज्यांनी हजारोन चे घोटाळे केले असे स्वगाताध्यश असतील आणि ज्यांना साहित्याचा गंध नाही असे नारोमणी व्यासपीठावर बसून आपण काय वाचतो आणि का वाचतो अशा चर्चा सत्रात भाग घेणार असतील. तर या संमेलनाचा नेमका काय दर्जा असेल या बाबत शंका येणं साहजिक आहे. पण तरीही या गोंधळात काही चांगली माणस देखील आहेत हे मान्य कराव लागेल. काल एका वृत्तवाहिनीवर एका बड्या राजकीय पक्ष्याच्या नेत्यांनी पुष्पा भावे कोण ?असा सवाल केला .वाण्याच्या दुकानात याद्या करणारे उद्या साहित्यिक म्हणून मिरवतील अशी भीती व्यक्त करत बोचरी टीका केली. तेव्हा कदाचित ते विसरे असावेत आधी ते स्वतः पत्रकार होते आणि मग त्यांच्या विचारांची उंची पाहून कदाचित त्यांना राजकारणात संधी मिळाली असावी .या महाराष्ट्राला विचारांची किंमत आहे का ? असा खडा सवाल आता वागळे काकांनी विचारायला हवा नाही तर काही दिवसांनी महाराष्ट्रातले विचारवंत इतर राज्यात स्थाईक होतील आणि मग कधी काळी त्यांची एकादि प्रतिक्रिया हवी लागली तर त्यांना गुजरात नाही तर केरळच्या स्टुडीवो मध्ये बोलवावा लागेल.

पुष्पा भावे यांना कोकणात येण्याकरता मज्जाव करण हि कोणती मानसिकता म्हणावी त्यांचा हा वैयातिक विरोध असू शकतो म्हणून त्यांना अस अडवण उचित वाटत नाही आणि असही काही झाल तरी साहेबांच नाव व्यासपीठाला मिळणारच आहे. मुळात साहेबांच नाव तमाम शिव सैनिकांच्या आणि बाळासाहेबांना मानणाऱ्या जनतेच्या हृदयावर कायमचं कोरल गेलंय आता निदान त्यांच्या नावासाठी अशी भांडणं नको साहेबांच्या गेल्या वाढदिवशी त्यांना भेटण्याच्या योग आला होता असंक्य हिंदूजनांचे दैवत असलेले साहेब तब्बल अर्धा तास इतक्या मोकळेपणाने गप्पा मारत होते. साहेब असामान्य व्यक्तीमत्व आणि तरीही सामान्य माणसाची कदर करणारे होते हे त्यांच्या चहा पाणी घेवून जा रे या वाक्यातून आलच.

मी म्हणतो पुष्पा भावेंनी या संमेलनाला हजेरी लावावी अन्यथा हि विचारांची आणि अभीव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याच उदाहरण म्हणता येयील हवतर मी त्यांना घेवून जायला तयार आहे बघू कोण आडवतो आणि अडवून तरी काय करतील हात पाय तोडतील किवा जीवानिशी मारतील खरा तर त्याची पर्वा नाहीच कारण राजकीय हितसमंध आणि आर्थिक बेरजे करता ज्यांनी साहित्य संमेलनाचा राजकीय चव्हाटा केलाय इतकी वाईट गोची अजून आमची झाली नाही ...


तुमच्या तिखट गोड आंबट आणि खारट अश्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत आहे .

-- संतोष टाकळे

घराणेशाहीच्या देशात ...........!




घराणेशाही आणि राजकारण अशा अनुषंगाने एका वृत्त वाहिनीवरची चर्चा पहिली आणि मला माझ्याच क्षेत्रातल्या एका जेष्ठ पत्रकार असलेल्या सरांचा युक्तिवाद पाहून काहीवेळ नवल वाटल हेच का ते ज्यांनी निर्भीड पत्रकारिता केली ज्यांच्यावर प्राणघातक हल्ला होवूनही जे आपल्या मतावर ठाम राहिले त्यांच्या या बेताल व्यक्तव्याचा काय अर्थ समजावा ???

राहुल गांधी, आदित्य ठाकरे, मिलिंद देवरा,अखिलेश यादव, सुप्रिया सुळे ,जगन मोहन रेड्डी ,कानिमोझी हे सगळे काय अमेरिकेतले नेते आहेत का ? टक्केवारीत सांगायचं झाल्यास तब्बल ६५ % उमेदवार हे घराणेशाईच्या व्हाईट कारपेट वरून थेट राजकारणात आलेत. आणि आमचे जेष्ठ विचारवंत आणि सुप्रीम पत्रकार एक एका घराण्याची वकिली करत प्रसारमाध्यमांच्या चर्चा गाजवता आहेत .काय म्हणावं तुम्हाला लोकशाहीच्या या चवथ्या खांबावर मनी प्लांट अगदी जोरात वाढतो आहे. एकदिवस हा खांब कोसळणार कि काय अशी भीती वाटते. अहो गल्लीतल शेंबड पोर सांगेल अशा उपहासात्मक मुद्यांना वैचारिकतेची आणि सभ्यतेची जी चड्डी घातली जातेय ते दयनीय आहे. काही मुद्धे खरतर अगदीच दर्जा नसलेले असतात मात्र सर्वात जास्त TRP अशाच मुद्यांना आहे हे आणि एक दुर्देव. काल परवा राज साहेबांची पत्रकार परिषद झाली त्यातही ढोबळे आणि अशाच ठिसूळ मुद्यांवर साहेब बोलले पण ज्या गावात शेती आणि जनावरांच सोडा पिण्याच्या पाण्याची मुश्किल झालेय ते महाराष्ट्राच्या नवनिर्माणात धोरणात येत नाहीत का ? असा प्रश्न कसा कुणी विचारला नाही हे नवल .यावेळी कदाचित हळदीकुंकू उशिरा आहे शिवाय अजूनही तशी फार मोठी झळ नाही म्हणून कदाचित ताई ,वाहिनी,दीदी ( आपल्या नेते मंडळीच्या कारभारणी, लेकी आणि सुना ) डोळ्यांवर महागडा चष्मा लावत आपल्या लक्झरी गाडीतून दुष्काळी भागात चारा पाणी घेवून अजूनही पोहचल्या नाहीत.कुणाच्या तरी डोक्यातून सुपीक आयडिया आली तर पाण्याची बाटली आणि चाऱ्याची मोळी देत वाहिनी इथे मीडिया समवेत हळदी कुंकू साजरा करतील अहो मीडिया हवाच ? १० मिनिटात १० बातम्यांमध्ये हे सगळ दिसायलाच हवं आगळा वेगळा हळदी कुंकू वहिनीनी लुटलं चाऱ्याच वाण अशी ब्रेकिंग दिसायला नको का ?.etc etc.

घराणेशाहीच्या सगळ्याच उमेदवारांवर हि टीका कारण योग्य नाही कारण काही उमेदवार हे खरच तळमळीचे कार्यकर्ते होते. ग्राउंड लेवल वर्क करून ते आज नेते झालेत पण त्यांनाही त्यांच्या पूर्वजांची पुण्याई होतीच हे विसरता येणार नाही.

कार्यकर्ता आणि नेता यात जो आर्थिक पूल उभा राहिला आहे या पुलावरून बऱ्याच गोष्टी ट्रान्सपोर्ट झाल्यात त्याही टोलफ्रीच्या सवलतीत प्रचंड भयंकर आहे हे सगळं न सहन होणारं पण काय करू राव माझे बाबा आमदार नाहीत आणि निवडणूक लढवायला लाखो रुपयांचा फंड नाही

आम्ही आपले लिहित राहणार

कुणी जीव घेण्याचा प्रयत्न केला तरीही

- संतोष टाकळे

* राहुल गांधी यांचा फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे याची नोंद असावी

The real value of हळदी कुंकू .................!





गेल्या महिनाभर हळदी कुंकवाचा मोसम चालू आहे. रोज एक नवी वस्तू घरी अगितुक पणे हजर असते. रवा , साखर , गुळ ,शेंगदाणे, तेल, साबणाच्या वड्या, फणी आणि काल तर चक्क ताई hand wash घेवून आली. एका राजकीय पार्टीने आयोजित केलेल्या हळदी कुंकवात हे वाण मिळालं .मी जरा कोरडं हसत म्हणालो आपण काय update झालोय नाही hand wash वेगरे वेगरे , तात्विक वादविवादात नेहमी माझ्या तोंडाला फेस आणणाऱ्या ताई ने याचंही उत्तर शोधून आणलं होत.hand wash वाटणाऱ्या राजकीय पार्टीची या कंपनीत युनियन आहे फुकटात मिळाले म्हणून त्यांनी ते वाटलेत अशी कुजबुज होती. पण बायका काय हात धुवायची सोय केलीत वाहिनी म्हणत चिमटा काढत आल्या. मी पण मग अधिक प्रश्न न विचारता हात धुवून घेतले.

मुळात हळदी कुंकू हि संकल्पना कशी आली असावी या बद्दल मी आमच्या कुलकर्णी आजी यांना विचारलं त्यावर त्या म्हणाल्या आमच्या काळात असे डझनभर हळदी कुंकू होत नसत आम्ही परसातल्या झाडांची या काळात येणारी चाफा ,जाई जूई ,बट गुलाब ,शेवंती आणि अशी अनेक फुलं गोळा करत असू संध्याकाळी बायका जमत आमच्या गप्पा गोष्टी होत फुला-कळीने वाण देवून झाल कि कधी चहा तर कधी मसाला दुध किवा मग कधी नुसती साखर हातावर ठेवून कार्यक्रम संपे पण त्यनिमीततने आमच्या बायकांच्या अनेक गोष्टींवर चर्चा होई तेव्हा कुटुंब नियोजन कस करावं, साथीच्या रोगांपासून वाचण्याकरिता लस कोणती ते अगदी बायकांच्या नाजूक प्रश्नाकडे आमची चर्चा जाई .अगदी सहज एखादी मुलगी पसंत पडली तर आम्ही बिनधास तिला विचारात असू काय ग माझी सून होशील का ? तेवढा मोकळेपणा होता तेव्हा.

आज याच स्वरूप बदललय उगाच दिखावा आलाय एकीने चमचा वाटला कि दुसरी पलेता वाटते अशी स्पर्धा का आणि कशाला स्वतःच्या सुब्बतेच प्रदर्शन करण्यासाठी हा सोहळा असतो अशी जणू समजूतच झाली आहे नटून थटून जाण इथवर ठीक आहे .त्या दिवशी मात्र हद्द झाली हळदी कुंकवासाठी चक्क काकींनी ३ हजारांची साडी , ४ तोळ्यांचा श्रीमंत हार , आणि वाण म्हणून वाटायला चांदीचे एकूण १०० पंचपाळ बापरे म्हणजे लाखाच्या घरात हा खर्च गेला असेल यावर मी त्यांना हटकलं काकी हे जरा अति होतंय त्यावर त्याचं उत्तर पहा अरे मागे हे आजारी होते तेव्हा देवीला नवस बोलले होते दणक्यात हळदी कुंकू करेन आणि चांदीच वाण वाटेन आणि तसही काकांना त्यांचे खूप दिवसांपासून अडकलेले पैसे पण मिळालेत मी मात्र निरुत्तर..

मला पुन्हा कुलकर्णी आजी आठवल्या यंदाच त्यांनी साठी पार केली. कुलकर्णी आजोबा जाऊन १० वर्ष झालीत. पण आजी आजही थोरलं कुंकू लावतात गळ्यात पाचकणी मंगळसूत्र डोक्यात गजरा किवा निदान एखादं फुल त्यांना अस राहताना पाहून समाजात कुजबुज होत होती पण आजही त्यांचा नित्यक्रम चालू आहे . मी राहून राहून त्यांना एकदा विचारलंच आजी तुमचा असा साज त्यावर त्याचं स्पष्टीकरण मार्मिक होत त्या म्हणाल्या लेखक महाशय तुम्ही असा प्रश्न कधी मला विचाराल अस वाटल नव्हत पण आता लक्ष देवून ऐका आम्ही तेव्हा त्यांच्या स्हेह बंगल्याच्या हिरव्यागार बागेत होतो गुलाब, चाफा , शेवंती आणि तत्सम फुलं बहरून आलेली आजींनी बटव्यातून एक लवंग तोंडात टाकली आणि त्या भूतकाळात गेल्या, तेव्हा मी घरात एकुलती एक मुलगी कोकणातले बागाईतदार असलेले पेंडसे आप्पा माझे बाबा लहानपण सगळ कोकणात गेलेलं पाटाच्या पाण्याला जशी लय असते तशी खळखळ करणारी लय होती माझ्या जगण्यात अगदी आनंदी आनंद रोज मी डोक्यात गजरा माळत असे आमची नानी रोज माझ्या साठी गुंफून देई मी तशी डेरिंग बाज नारळावर सपासप चढायची , मारक्या गाईला पाजवायची, एकदा तर मी बैलांची झोंबी सोडवली होती. आजी एव्हाना पार कोकणातल्या बागेत हरवल्या होत्या त्यां पुन्हा भानावर आल्या तेव्हा त्यांचे हात पाय कापत होते. आधारकाठी वर थोडा जोर देत त्या पुन्हा उठल्या आणि म्हणाल्या आज मी जशी राहते आहे त्याचं श्रेय यांना द्यायला हव ते नेहमी म्हणायचे मधू मी असलो नसलो तरी तू मात्र अशीच राहा रोज गजरा माळ थोरलं कुंकू लाव.

आजहि मी हळदी कुंकू करते वाडीतल्या बाया जमतात गोड धोडाचा कार्यक्रम होतो. आम्ही प्रत्येकी १०० रुपयांची वर्गणी जमा करतो आणि जेवढे जमतील तेवढे पैसे आम्ही पुण्यातल्या वृद्धाश्रमाला पाठवतो सोबत आम्ही घरगुती केलेला तिळगुळ, देशपांडे बाईची खासियत असलेलं मिक्स लोणचं,आणि आमच्या महिन्याच्या फंडातून जमा झालेल्या पैशातून आणलेल्या इतर काही वस्तू वृद्धाश्रमातून गाडी येते हे सगळं न्यायला .आजींनी पुन्हा एक सोन चाफा माळला आणि बस रे चहा टाकते म्हणत स्वयंपाक खोलीकडे वळल्या काही वेळ मला आजी आणि काकी यांच्यातला तुलनात्मक ग्राफ दिसला आजींच्या जिन्दादिल विचारांचा ग्राफ लिमिट क्रॉस करत होता.

साकारात्मात विचारांनी जगणं बदलत,अर्थात ते आचरणात आणायला हवेत एव्हाना आजींनी आणलेल्या गवती चहाच्या उत्तेजक गंधाने मला पुन्हा नवविचारांच्या शोधात जायची उर्मी दिली होती आणि त्यांनी माळलेल्या जाई जुईच्या गजऱ्याने जगण्याची धुंदी


इति हळदी कुंकू


- संतोष टाकळे


* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे याची कृपया नोंद असावी .

शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा ................!





डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अमाप जनसागर चैत्यभूमीवर लोटला होता .लांबच लांब रांगा अगदी ५ ते ६ किलोमीटर पर्यंत पोहचल्या होत्या दरवर्षी वाढत जाणारी गर्दी अशीच वाढत जाणार पण जशी वर्ष सरता आहेत त्या मनाने या अनुयायांची परिथिती मात्र काही केल्या बदलत नाही. अजूनही कित्तेक गावात यांच्या वस्त्या वेगळ्या आहेत गरिबी इतकी कि इच्छा असून शिकता येत नाहि. आरक्षणाचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनी स्वतःच भलं करून घेतलं पण खरतर अजूनही बरीच विषमता आहे.काही वर्षांपुर्वी मी ६ डिसेंबरला शिवाजी पार्कवर गेलो होतो निमित्त होतं डॉ.बाबासाहेब आंबेडकर डायरीच प्रकाशन मानसी पब्लिकेशनच्या या डायरीच संपादन मी केलं होतं कित्तेकांनी तेंव्हा आक्षेप घेतला होता मराठा समाजाच्या माणसाला काय कळणार बाबासाहेब थोडीफार टीकाहि झाली नंतर डायरीच संपादन बघून त्यांनी माघार घेतली त्यावेळेस बघता बघता १००० डायऱ्या विकल्या गेल्या आणि त्याही फक्त १ तासात बाबासाहेबांवरच हे अतुलनीय प्रेंम म्हणावं लागेल.

याच दरम्यान मी कित्तेक तरुणांना बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेलं पाहिलं त्यांचं वाचनही प्रगल्भ होतं जेंव्हा ते माझ्यासोबत बोलत होते तेंव्हा कितेक संदर्भ त्यांच्या बोलण्यात आले काही तर इंगलिश मध्ये धाड धाड बोलत होते त्यापैकी काहींनी लॉ केला होता मी विचारलं बरं मग तुम्ही वकिली कोणत्या न्यायालयात करता त्यावर त्याचं उत्तर चक्रावणार होत त्यातला एक हसत हसत म्हणाला आम्ही लॉ काय वकिली करायला केला नाहि तर बाबासाहेबांनी सागितलं होतं कायदा शिका म्हणून आम्ही लॉ केला मी काही वेळ निरुत्तर झालो होतो बाबासाहेबांचे विचार सक्षम समाज घडवणारे होते त्यांच्या विचाराने नुसतं भारावून चालणार नाहि तर ते जगण्यात उतरवावे लागतील हे या तरुणांना आजवर कुणी समजावलं नसेल का ? असा एक प्रश्न न राहून मनात आला कारण शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा असे सांगणारे डॉ.बाबासाहेब नुसतं शिक्षण घ्या आणि तत्वन्यान वाटत फिरा असे कधीच म्हटले नव्हते त्यांना अपेषित होता सामाजिक आणि व्यतिगत विकास जो अजूनही तितकासा झालेला नाहि. 


- संतोष टाकळे
Sanntosh Taakale

जेंव्हा सहनशिलतेचा अंत होतो





कालपरवाचीच गोष्ट काहीतरी बिनसलं होतं माझा मूड खराब होता खुप दिवसांनी माझं माझ्यावर नियंत्रण नव्हतं जे अपेषित नसतं ते घडल्यावर असं होतं मी माझ्या कामाच्या बाबतीत फालतू थेरं सहन करत नाहि विषय असा कि या सगळ्या गाबडीत माझ्या कामावर परिणाम झाला मी कधीच वैतागून काम केलं नाहि आणि तेंव्हा मी लहान सहन गोष्टीवर वैतागत होतो कुणावरही ओरडत होतो
नेहमी हसत खेळत काम करणारा हा असं का वागतो आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला शेवटी आमच्या ऑफिस म्यानेजर ने मला बोलावलं नेमकं कारण विचारलं तेंव्हा तो म्हणला संतोष कितीही काही झालं तरी कामावर परिणाम होवू देवू नकोस आज तू इतक्या माणसांच्या नजरेत खुप चांगली इमेज तयार केलीस ती बदलायला वेळ लागत नाहि अगदी सोप्या भाषेत आणि सहजपणे तो बोलून गेला आणि झटका लागावा तसा मी पुन्हा जागा झालो
हा अनुभव तुमच्या सोबत शेअर करण्यामागे एकच उद्देश आहे तुम्ही जे वर्षानुवर्षे काम करून गुडविल तयार करता ते असं एका क्षणात घालवू नका थोडा विचार करा हवं तर ब्रेक घ्या तुमचा प्रॉब्लेम काही जवळच्या मित्रांसोबत बोलून सोडवता येवू शकतो पण रागाच्याभरात तुमच्याकडून असं काही घडू देवू नका कारण एकदा वेळ गेली कि परत येत नसते आणि शेवटी काम, पैसा आणि तुमचं पद हे क्षणीक आहे.

दिनेश (आमचा अड्मीन म्यानेजर )
मित्रा Thanks Yaar

- संतोष टाकळे
Sanntosh Taakale


एक थप्पड़ की गूंज............!





बस एक थप्पड़ ने पुरे महाराष्ट्र को हिला दिया ब्रेकिंग न्यूज़ चा अक्षरशा पावूस पडला समर्थक रस्त्यावर उतरले तोड़ फोड़ केली कुणी तरी प्रतिकिर्या देताना म्हणाला निषेद करतो या घटनेचा महाराष्ट्र बंद करू 

महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झालेला हल्लां दुर्देवी असला तरी ही सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे दिवसागणीत वाढणारी महागाई ,बेरोजगारी आणि भ्रष्टाचारालाकंटाळलेल्या जनतेच्या सहनशिलतेचा हा उद्रेक आहे उगाच कोण कशाला कोणाच्या कानाखाली मारेल खंर तर साहेबांनंतर बरेच जण आहेत ज्यांच्या सणसणीत कानाखाली बसू शकते स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या लालची राजकारण्यांची या नंतर खेर नाही आमचा चहावाला पोऱ्या म्हणाला साहेब बुरा मत मानना लेकिन उस बंदे ने सहि किया आप के पावर साहेब जब से खेत मंत्री ( agriculture minister ) बने है तबसे उनोहने ना हमारे गाव के लिए कुच किया ओर ना आपके बस क्रिकेट के काम मै उनकि रुची जादा है हमने सुना था वो खुद किसान है जब एक किसान किसान का दर्द नही जान सक्ता तो इससे जादा हम क्या बोल सकते है चहा देवून तो निघून गेला पण त्याची हि प्रतिक्रिया स्वाभाविक होती कारण त्याची गावी ४० एकर शेती आहे शेती करायला पैसा हवा म्हणून तो मुंबईत चहाचा ठेला चालवतो.

रोज नवे घोटाळे करणारे आमचे जेष्ठ कनिष्ट राजकारणी आता ओवर लिमिट झालेत आज की इस थप्पड़ की गूंज बहुत कुछ बताके गयी जो आप भी अच्छे से जानते हो

- Sanntosh Taakale

यशा अपयशाची गोळाबेरीज ................!





दहावीची परीक्षा सुरु झाली आहे आयुष्यातील हा एक महत्वाचा टप्पा जिथे तुमच्या करियरचा महामार्ग सुरु होतो. माझी एक आठवण शेअर करायची आहे . मला अजूनही आठवतंय मी १० वीत असताना बाबांनी खुप मेहनत घेतली होती सकाळी पहाटे ते ४ वाजता मला ते उठवायचे स्वतः माझ्यासाठी चहा करायचे आणि माझी सोबत म्हणून एखादं पुस्तक वाचत बसायचे मध्ये मध्ये थोडी शेकोटी कर ,एखादं बिस्कीट आणून दे अशी त्यांची लगबग चालू असे मी मात्र थोडा झोपाळलेल्या अवस्थेत डोळ्यासमोर नाचणाऱ्या शब्दांना पकडायचा प्रयत्न करीत असे हि परीक्षापण साली नेमकी गुलाबी थंडीत येते. मस्त ताणून देवून सूर्य डोक्यावर येईस्तोवर झोपायचा मूड असला तरी सकाळी पुस्तक घेवून घोकम पाट करणं भाग होतं
पेपर जायचे तसेच गेले मनात धुगधुग होतीच पण सुट्टी मजेत घालवली निकालाची तारीख जाहीर झाली आणि रोज आपण ८० % मार्कस मिळवल्याची सुखावक स्वप्न पडू लागली. सोबत आजुबाजूवाले माझ्या आनंदात भर घालत होते कुणी म्हणे संतोष निदान ७५ % काढील तर कुणाला मी शाळेत निदान तिसरा यायची खात्री मी मात्र मी पास होणार याच शक्यतेवर थांबलेला अगदी निकालाचा दिवस उजाडला सकाळ पासून मी अस्वस्थ सगळ्या देवांना विनवण्या झाल्या बाबा कामावर जाताना पेढ्यांसाठी १०० रुपये देवून गेले त्यांना मी पास होण्याची १०० % खात्री होती. दुपार झाली होती तेंव्हा आता सारखे निकाल इंटरनेटवर येत नसत जे काही आहे ते मार्कशीट वर मी शाळेत पोहचलो तेंव्हा कळलं निकाल ३३ % लागला आहे बरेचजण उडालेत मला तर घाम फुटला मी निकाल घेण्यासाठी रांग लावली तेंव्हा पण मनात अनेक शंका येत होत्या काय होयील माझं कोण जाणे ?
आणि शेवटी अनपेक्षित निकाल आला गणितात माझी दांडी गुल मला तर भोवळून आलं समोर काही दिसेना काय झालं म्हणून मित्र विचरत होते पण मी सरळ सायकल घेतली आणि घरचा रस्ता धरला रस्त्यात बरच जण भेटले पण मी काहीच न बोलता सायकल पळवत घरी आलो तर दारात अर्चू ताई उभी माझा चेहरा बघून कदाचित ती समजून गेली आणि दारातच एक सणसणीत कानाखाली आवाज झाला बस मग मी जो भोकाड पसरला कि आजूबाजूच्या शेजाऱ्यांना मी नापास झाल्याची वायरलेस बातमी समजली मला बाकी कुणाची भीती नव्हती आत्ता बाबा काय म्हणतील याची चिंता दिवस सरला बाबा यायची वेळ झाली मला तर धडकीच भरली होती आमच्या घरासमोर आमची आक्का रहायची बाबांना येताना बघून ती समोर आली बाबांना म्हणाली अनंता पोरगा नापास झाला रे पण तू बाबा काय बोलू नकोस असुदे होयील तो पास पुढच्या वेळेस बस बाबांचा पारा तिथेच चढाला ते तडक घरी आले कमरेचा पट्टा काढला आणि मला शोधत पुढे आले आई त्यांना आडवत होती पण बाबा ऐकले नाहीत साट साट पट्टा चालला मला ओरडायची फुरसत मिळाली नाहि आणि हाता पायावर लाल ओळ उमटून आले बाबा खुप भडकले होते मी निदान ४ दिवस अंथरुणातून उठलो नाहि.
मी ऑक्टोबरचा फॉम भरला आणि परत अभ्यासाला सुरवात केली तेंव्हा घरातून मी बाहेर पडत नसे पण ते दिवस पावसातले आणि शेतीच्या कामाचे होते. बाबा आधीच माझ्यावर चिडले होते म्हणून त्यांनी मला नांगरणी पासून ते लावणी पर्यंत राबवलं लोक म्हणायचे काय पोराला
मारून टाकणार काय त्यावर बाबा म्हणायचे अहो हा नवीन बैल घेतला आहे शाळेत पाठवलं तर नापास झाला माझे दोन बैल आहेत त्यात हा तिसरा अक्षरशः लाज वाटायची स्वतःची ते दिवस कसे घालवले ते माझं मला माहित मग मात्र मी ठरवलं आता बस मी काही तरी करून दाखवेन आणि मग काही दिवसात मी दापोली सोडली.
मी मुंबईत आलो ते शिक्षणासाठी पुन्हा नवीन सुरवात शेवटी कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि मी बारावीच्या तयारीला लागलो आता मला पुन्हा तीच चूक करायची नव्हती बाबा अजूनही फारसे बोलत नव्हते मी कॉलेज जॉईन केलं आणि पैसे कमी पडले माझ्या मोठ्या ताईने आणि माझा मित्र अजित कांबळे उर्फ कामत यांनी माझ्या पैशाची व्यवस्था केली आणि माझं कॉलेज सुरु झालं एकदाची बारावीची परीक्षा आली तेंव्हा मी प्रभादेवीच्या नेहरू नगरात झोपडपट्टीत राहत होतो आमच्या बाजूला बिहारी , यु पी ,गुजराथी ,बंगाली आणि तेलगु अशा वेगवेगळ्या प्रांतातले लोक राहत होते रोज सकाळी ७ वाजले कि प्रत्येक जण आपआपले सुगम संगीत लावीत शर्मांचा घरी सैया तोहर झटका ,रामाक्रीश्णनच्या घरी आणा अंताने इपडू लेता असं काहीसं सुरु होई आणि माझ्या अभ्यासाचा बट्या बोळ मग मी सिद्धिविनायक गार्डन मध्ये जायला सुरवात केली कसा बसा अभ्यास पूर्ण केला आणि परीक्षा पूर्ण झाली सुट्टी सुरु झाली पण मी लगेच काम शोधलं कीर्ती कॉलेज मध्ये माझा एक मित्र होता तो केटरिंग मध्ये काम करायाचा त्याच्या सोबत मी पण वेटरच काम सुरु केलं त्या काळात मला एकूण २५०० रुपये मिळाले पण जेंव्हा कुणी ये वेटर यहा आना असं बोलवल्यावर वाईट वाटे पण चालता है यार म्हणून मी काम करत असे तेंव्हा ठरवलं एकदा आपण असं सुटाबुटात साहेब बनायचं आणि जेंव्हा मी पहिल्यांदा सुट घातला तेंव्हा डोळे पाणावले ते दिवस आठवले मी कोणत्याही पार्टीत गेलो तरी वेटरशी अदबीनं वागतो त्यांची विचारपूस करतो.
जेंव्हा माझा बारावीचा निकाल लागला तेंव्हा माझा माझ्यावर विश्वास बसेना मी ७२ % मिळवून पास झालो होतो.पण खरी मेहनत माझ्या ताई आणि दाजींची मी मुंबईत आल्या नंतर तेच माझे आई बाबा झाले. आजही तेच माझे सगळे निर्णय घेतात मी नशीबवान आहे कि मला एक नव्हे तर दोन बाबा आणि दोन आई आहेत. आज जे मला हवं होतं त्याच्या जवळपास मी पोहचलो आहे. मला ओळख न दाखवणारे माझे वर्ग मित्र आज फेसबुकवर भरभरून माझी तारीफ करतात मला बैल म्हणून राबवणारे माझे बाबा आमच्या पोरग्याने नशीब काढलन म्हणून अभिमानाने बोलतात. शेवटी माणसं वाईट नसतात हो ती वेळ त्यांना वाईट बनवते
तुम्हाला हा अनुभव सागण्याचा उद्देश हाच अपयश शेवट नसतो तर एक नवी सुरवात असते
शेवटी यशाची सर कशालाच येवू शकत नाहि प्रामाणिक मेहनत , स्वतः वरचा आत्मविश्वास आणि तुमचा चांगुलपणा तुम्हाला कधीच हरू देणार नाहि



अपयश यशाची पहिली पायरी असली तरी
यशाची पहिली चढायचा अनुभव काही वेगळाच
तुम्हा सगळ्यांना खुप खुप शुभेच्या  !!!



- संतोष टाकळे 


Sanntosh Taakale

शाळा - बाई आणि गुरुजींची ................!



आमची कोव्लारू मराठी शाळा सकाळी १० चा टोला पडायच्या आत आम्ही धावत पळत शाळा गाठत असू हातात कापडी पिशवीचं दप्तर, त्यात एक पाटी पेन्सिल, दुपारसाठी डबा आणि शाळेत बसायला गोन्ता, तेंव्हा आमचा गणवेश पांढरा शुभ्र ( खरतर थोडासा मळलेला ) शर्ट आणि खाकी हाफ प्यांट

तो काळच फार वेगळा होता कधी पायात चप्पल नसेल तर कुणी हसलं नाहि किवा कापडी पिशवीच दप्तर आहे. म्हणून कुणी भुवया उंचावून कुतूहल पूर्वक हिणवलं नाहि ,जे होतं ते होतं तिथे दिखावा नव्हता. एक किस्सा आठवतोय मी तेंव्हा पाचवीत होतो. यावेळेस आलेल्या वर्गशिक्षिका बर्वे बाई फार कडक स्वभावाच्या त्या गणित शिकवायच्या एकदा गृहपाठ तपासताना त्यांनी गणिताच्या वहीत मराठीचा गृहपाठ केलेला पहिला त्या खुप चिडल्या अगदी वही फेकून दिली .आणि शिक्षा म्हणून पट्टीने हात लाल केला. खरतर माझ्याकडे नेमक्या ३ वह्या होत्या आणि विषय ६ मग मी एका वहीत २ विषय लिहून वेळ मारून नेली होती . तेंव्हा आम्ही एकूण ४ भावंड शाळेत जायचो अर्थात आई बाबांची खर्च भागवताना काय तारांबळ होत असेल हे आता कळत आहे. पण जेंव्हा बर्वे बाईना हे सगळं कळलं तेंव्हा बाईनी स्वतः ४ वह्या आणून दिल्या. माझ्या हातात वह्या देताना बाई म्हणाल्या उगाच मार खल्लास बोलता आलं नाहि मी काय बोलणार तुम्ही बोलूच दिल नाहीत असं नुसतं बोललो असतो तर पुन्हा ४ पट्ट्या हातावर चमकल्या असत्या मी नुसतं मान खाली घालून ऐकत बसलो.

असे खुप किस्से आहेत . पण ते दिवस होतेच फार वेगळे शाळेत गुरुजींचा धाक होता. कितीही झालं तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक आपलेपणा होता. शाळेतून घरी येताना बाई किवा गुरुजींच घरगुती कामं करण्यातही एक मजा होती. त्यातल्या काही मजेदार कामांची यादी गुरुजींच्या सायकलचे पम्चर काढून आणणे, पिठाच्या गिरणीतून खमंग भाजणीच दळण बाईनच्या घरी पोचवणं ,गुरुजींच्या घरी जावून त्यांचा डबा घेवून येणं, फाटी फोडून देणं,अशी काही मजेदार कामं तर बाईनच्या खास मर्जीतल्या मुली बाईसाठी अबोली - जाईचा गजरा गुंफून आणत , त्यांना सकाळी दोन चार हांडे पाणी आणून देत, संध्याकाळी बाई घरी निघाल्या कि या मुली पुन्हा बाईनसोबत त्यांची पिशवी सांभाळत घर गाठत कधी कधी बाई आजारी असल्या तर या मुली चार पाच दिवस बाईनच्या सेवेत असत अगदी त्यांना पुन्हा शाळेत घेवून येस तोवर यांची सोबत असे .काही असो पण तो जिव्हाळा वेगळाच होता.आम्ही हक्काने म्हणायचो गुरुजी उद्या सुट्टी आहे बोला काय काम आहे. थोडं डोकं खाजवत गुरुजी म्हणत असं म्हणतोस अरे त्या आमच्या बागेत जल्ला पातेरा किती झालाय उडवून दे उद्या दुपार पर्यंत कि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तयार दुपारपर्यंत बाग चकाचक साफ मग गुरुजी अभिमानाने लोकांना सांगत माझी पोरं नाहि हो मला काही करू देत. तेंव्हा त्यांचा चेहरा एक विलक्षण तेज आणून समाधान देत असे.

आज शिक्षक दिन ते जुने दिवस पुन्हा आठवले खरतर जे दिवस निघून जातात ते असेच कधी तरी आठवतात आणि आपण पुन्हा काही क्षण त्या विश्वात पुन्हा एक फेर फटका मारून येतो . पुन्हा नव्याची सुरवात करण्यासाठी

तसे सगळेच शिक्षक लक्षात राहणारे होते पण माझ्या मराठी शाळेतल्या नरवणकर बाई ,सैतवडेकर बाई , बोभाटे गुरुजी, पुळेकर आणि तलाठी गुरुजी, बर्वे बाई , कुलकर्णी बाई आणि असे अजून बरेच माझे गुरुवर्य ज्यांची आठवण फक्त शिक्षकदिनी नव्हे तर नेहमीच येते लिहताना एखादं अक्षर चुकलं किंव्हा तत्वतः न पटणारी गोष्ट केली कि गुरुजींच ते वाक्य आठवतं बाळ असं करू नये मी हेच शिकवलं का तुला ...... !!!

- संतोष टाकळे.


कोकणी माणसं........... !


परवाच्या गणेश उत्सवात आमचे लांबचे मामा घरी आले होते साठी पार केलेले बळी मामा अजूनही तसे राकट आता तसा प्रवास त्यांना जमत नाही पण बेबीला( माझी आई )बघायला आलो बावा म्हणत त्यांनी मला लहानपणी आवडत असलेला पारलेजी बिस्कीटचा पुडा समोर धरला मला ते दिवस आठवले लहानपणी मामा वरचे वर येत असत तसं मामांना कोण नाही आमची आई त्यांना आधार पूर्वी मामा बोटीवर जात आणि जेव्हा जेव्हा ते आमच्याकडे येत तेव्हा भरपूर मच्ची ( मासे ) आणत असत. सोबत आमच्यासाठी चणे ,वाटणे ,लिंबाच्या आणि पेपरमिटच्या गोळ्या, पारले जी चा पुडा आईसाठी साडी किंवा अगदीच काही नाहि तर एखादा ब्लावूज पीस तरी आणत यावेळी मामा खूप वर्षांनी मला भेटले. तसे मामा फार प्रेमळ पण त्यांचा बडबड्या स्वभाव डोक्यात वात आणल्या शिवाय राहत नाहि खुप वेळा कुणी नाहि तर मीच त्यांच्या समोर बांधला जातो मग मामा अगदी गावातल्या सुताराच्या म्हशीने यावर्षी ८ वा रेडा दिलान ते अगदी हल्ली सरकारने लोकांना काय gas वर ठेवलान हाय इथपर्यत अगदी किस निघे पर्यंत गप्पा मारतात.

सहज बोलता बोलता ते मला म्हणाले तुम्ही पत्रकार पण तसलेच काय बाय लीव्हताव हवा तो नाय. काय तर ती अमिताभची सून काय जल्ला तिचा नाव ता कायशी ती जाडी झाली मेल्याणु एक पोर झाला की बाई जरा सुटते तिचा काय घेवून बस्लाव परवा शशीभाई च्या दुकानातून तंबाकू आणला ना त्या पुडीच्या कागदावर व्हता लीव्ह्लेला ती मंदाची पोरा वाचीत व्हती मी म्हतला काय र वाचताव तवा त्या पोरांनी वाचून दाखवलानी म्हतला आमच्या गावात बालत होताना बायका मारतात त्याचा कुणाला काय नाय आणि हई नुसती सुटली तर तिच्या फोटोनिशी पानभर लिव्हलानी उचलला पेपर आणि चुलीत टाकला खरा म्हटलास तर रागच आला मला तुला माहित हाय नाय बाबू माझा राग तू लहान होतास तवा आपल्या मागच्या परसावातल्या गोड्या आंब्यावर चढाला होतास नाय तवा सोलून काढली होती तुला नागडी करून विचार आएसला काय ग लता ? आई पण हो म्हणाली मला उगाचच शहारून आलं.

मामा आता पार रंगात आले होते. मागेच त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं त्याबद्दलचा किस्सा सुरु झाला. विषय निघालाच होता म्हणून सुरवात झाली
मामा - काय रे बाबू ओम्बाईला ( मुंबई ) लय मोठी हॉस्पीटला नाय
मी - हो खूपच मोठी.आणि डॉक्टर पण मोठे नुसते हात लावायचे हजारो रुपये घेतात
मामा - काय पण बोल पण आमच्या दाभोळच्या लुकतुके डॉक्टरची सर नाय यायची त्या डाकटराना तुझा ताप म्हण नायतर अगदी जबर रोग असुदे दोन पुड्या दिलान कि माणूस सकाळी उठलाच पाहिजेल
मी - आता मला कुणीतरी इथनं उचला ( मनातल्या मनात ) मामा अहो तुमी पण ना
मामा - लुकतुकेच मला म्हणला तुमचा आपरेशन काय एव्हडा मोटा नाय हाय मी म्हटला काय कापायचा हाय तो कापा मी झोपलेला पण साफ नाय मला त कापतात त दिसं पण मी नुसता पडलेला डाकटरानी पण कमाल केलीन तोंडात बोटं घातलीन म्हणाले मामा लय डेरिंग बाज हाव तुमी .

आता मात्र मामा अजून काही बोलायच्या आत मी पळ काढणार इतक्यात त्यांनी घड्याळ्याकडे बघीतलं आणि आईला म्हणाले बायो आता निघतो मी ५ ची गाडी भेटलं मला आई राहा म्हणाली पण मामा म्हणाले बायो तू भेटलीस माझा बाबू भेटला पोट भरला माझा आता राहून काय करू आईने गरम गरम केलेला चहा घेत मामा मला नीट काम कर कधी तरी फोन कर शशी भाईच्या दुकानात सकाळी ११ नंतर असतो मी तिथं अस सांगत होते आणि बायो पोराच्या लग्नाचा काय तो बघ हो का मी बघू पोरगी त्या चव्हाणाची पोर आहे. १० वी नापास हाय पण शिवन कलास केलान हाय काय ब्लावूजा शिवते तुमच्या ओम्बाईचे टेलर झक मारतील गावात नाव हाय तिचा मी डोक्यावर हात मारून घ्यायचा बाकी होतो. आई म्हणाली सांगीन मी तुम्हाला मामा निघाले तसे मी त्यांच्या हातात पान सुपारीला पैसे ठेवले तेव्हा भरल्या डोळ्यांनी मामा म्हणाले बाबू पैसं नको रे बाबा तुम्ही अशीच या मामाची आठवण काढीत रावा अजून काय नको
मामा मोकळ्या रस्त्याने निघाले आणि खूप एकट वाटलं मघापासून गोंधळून गेलेलं घर शांत झालं

माणसं अशीच असतात काही क्षणापुरती एकदा ती गेली कि राहतात त्या फक्त आठवणी अवचित डोळ्यांच्या पापण्या ओलसर करणाऱ्या



कलमनामा या लोकप्रिय साप्ताहिकात नुकताच हा लेख प्रसिद्ध झाला आहे

मला नेमही नवनवीन लिहायला भाग पडणारा आणि हक्काने माझ्या लिखाणावर प्रक्रिया करणारा माझा मित्र राकेशचे मनपूर्वक आभार


--- संतोष टाकळे


अराजकता ………. !





सध्या महाराष्ट्रात दशांअवताराचे खेळ सुरु आहेत रोज नवीन पात्र आपली कलाकारी दाखवतो आहे . काल अजित दादा आत्मक्लेश ( लय भारी आहे हा शब्द कोण जाणे कुणी शोधून काढला ) करायला यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर पोहचले ,दुपारी दोन घास खाऊन नुकताच मी लांब झालो होतो.  अजित दादा पवार यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर पोहचले,  दिवसभर इथेच थांबून करणार आत्मक्लेश , १ दिवसाचं उपोषण देखील करणार वृत्तवाहिनीची हि  ब्रेकिंग पाहून मी पुन्हा उठून बसलो काय करावं या माणसाला कसं वागतात हे लोक इतका त्रागा झाला कि परत मला भूक लागली. गंमतीचा विषय सोडा पण खरचं आता नाही सहन होत हे नेत्यांची हि अराजकता सध्या आपण जितक्या lightly घेतोय ती तितकीच गंभीर समस्या होणार आहे. 

 केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले आदरणीय पवार साहेब हतबल झालेले कदाचित आपण पहिल्यांदा पाहिलं असेल पुतण्याच्या टगेगिरीने काकांच्या तथाकथित सो कॉल image ला 
आज झुकावं लागलं शिवाय ज्यांना आपण Innocent म्हणून ओळखतो त्या सुप्रिया ताई देखील दादांच्या पाठीराखी झाल्या हे दुर्देव

 दुष्काळा सारख्या इतक्या गंभीर आणि संवेदनशील प्रश्नावर आपण इतकं खालच्या दर्जाचं राजकारण करतोय नक्की कुठल्या मानसिकतेच्या आणि माणुसकीच्या तत्वांच्या दिशेने आपण चाललो आहोत याचं  आत्मक्लेश नव्हे तर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे … 

ढासळलेल नेतृत्व … … 

मनसे - सध्या मनसेचे राज ठाकरे सोडले तर एकही खंबीर नेतृत्व असणारा नेता आज महाराष्ट्रात नाही. 

भाजप- भाजपला तर नेतृत्वच नाही जे काही आहे ते गटा गटात वाटलेलं तरीही नुकताच प्रदेश अध्यक्ष  झालेले देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आशेचा एक किरण मात्र पुन्हा जागा झालाय. 

शिवसेना -  साहेब गेल्यापासून शिवसेनेत नेत्याचं विक्रमी पीक आलंय ते आवरून ठेवायाला सध्या मातोश्रीवर जागाच अपुरी पडतेय. 


कॉग्रेस - कॉग्रेसच madam च्या आदेशाने अगदी कॉर्पोरेट style ने काम सुरु आहे . पुथ्वीराज चव्हाण सध्या महाराष्ट्राचे CEO म्हणून काम पाहता आहेत. 

RPI - डॉ बाबासाहेब आंबेडकर याचं स्मारक हे एकमेव उदिष्ट पूर्ण होयिस्तोवर यांना बाकी प्रश्नांकडे पाहायला सध्या वेळच नाहीये. 

एकंदरीत no strong leader in Maharashtra accept Raj Thackeray and some how Raj also Have limited voter bank येत्या निवडणुकीत याच विषयावर national level वर चर्चा होतांना दिसणार आहे यात शंकाच नाही  

सुस्तावलेले आपण …. 

अण्णा हजारे यांच्या आंदोलना वेळी पेटून उठलेला भारत काही महिन्यांपूर्वी पहिला आणि वाटलं अजूनही भारतीय जागे आहेत पण अन्नाचं आंदोलन गुंडाळल आणि लोक पांगले अत्याचारावर पेटून उठणारे लोक राजकारण्यांच्या टगे गिरीला कसे सहन करतात हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा . 

नेता -पक्ष- पार्टी - पद आणि राजकीय फायदा यांच्यापुढे  १ हंडा पाण्यासाठी तडफडणारे लोक यांची नेमकी किमंत किती हे सांगायला आता काय टेंडर मागवायला हवा आहे का ? 

शेवटी मला सुधा मूर्ती  यांच्या  Wise and Otherwise या पुस्तकातलं एक वाक्य इथे लिहावसं वाटत 

त्या म्हणतात - आपण नवीन इतिहास घडवत नाही कारण आपण घडलेल्या इतिहासात रममाण होतो.! 

कोणत्याही राजकीय पक्षाला टार्गेट करण्याचा  माझा उद्देश नाही. लेखात मांडलेले आक्षेप फक्त माझे नसून महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनातले आहेत याची राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी 

- संतोष टाकळे